पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या माजी विद्यार्थ्यांसाठी PTVA आयोजित हस्ताक्षर स्पर्धा
शाळेत असताना २३ जुलै आणि १ ऑगस्ट हे दोन्ही दिवस खास असायचे .२३ जुलैला लोकमान्यांची जयंती आणि १ ऑगस्टला पुण्यतिथी.
वक्तृत्त्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा अशी नुसती चढाओढ लागायची. संस्थेच्या शंभरीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा हे दिवस अनुभवणार आहोत. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांसाठी पा.टि.वि.अ.आयोजित करीत आहे हस्ताक्षर स्पर्धा.स्वहस्ताक्षरात लिहून पाठवायचा उतारा, स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि नियम खालील प्रमाणे.
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक आहे २५ जुलै २०२० .
हस्ताक्षर स्पर्धा नियम –
१) सोबत दिलेला उतारा स्वहस्ताक्षरात लिहिलेला असावा.
२) केवळ निळ्या रंगाच्या बॉल किंवा जेल किंवा फौंटन पेन ने लिहिलेला असावा.
३) केवळ पांढऱ्या रंगाच्या, रेघाळ्या फुलस्केप कागदावर लिहिलेला असावा.
४) कागदाच्या एकाच बाजूस लिहिणे आवश्यक .
५) सलग लिहावे एक ओळ सोडून एका ओळीवर लिहिलेले स्वीकारले जाणार नाही.
६) कागदाच्या वरच्या उजव्या बाजूला
i) आपले नाव, ii) फोन क्रमांक, iii) जन्मतारीख iv) आपण संस्थेच्या
कुठल्या शाळेचे आणि / अथवा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहात आणि
v) कोणत्या साली दहावी (किंवा जुने ११वी) पास केले ते वर्ष लिहावे.
आपण जर केवळ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असाल तर आपण पदवीधारक झालात ते वर्ष लिहावे.
७) कागद स्कॅन करून अथवा त्याचा स्पष्ट फोटो काढून तो खालील पत्त्यावर ई मेल करावा .
association@ptva.in
अथवा ९९८७०२१३०४ या क्रमांकावर व्हाट्स अँप करावा.
किंवा PTVA अँप वर किंवा PTVA फेसबुक पानावर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे
तो फॉर्म भरून तिथे आपली प्रवेशिका अपलोड करावी..
Google Form Link : Parle Tilak Vidyalaya Association`s Google form for Alumni Registration
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeKXjER9WXOWouj8j-0sxA_Txg1ZLthRJkzrBpxgk8X5HR7rg/viewform?vc=0&c=0&w=1
८) प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२०
अंतिम तारखेनंतर आलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. स्पर्धेबाबतचा अंतिम निर्णय व्यवस्थापनाकडे राहील.
पा.टि.वि.अ. च्या शतक महोत्सवी वर्षाचे कार्यक्रम जाणून घेण्यासाठी PTVA App लगेच डाउनलोड करा.
App Store : https://apps.apple.com/in/app/parle-tilak-alumni/id1517054272
Google Play Store :https://play.google.com/store/apps/details…
फेसबुकचे पेज लाईक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.facebook.com/ParleTilakVidyalayaAssociation/
खालील उतारा स्वहस्ताक्षरात लिहून पाठवावा.
नष्टो मोह : स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसान्मयाच्युत |
स्थितोS स्मि गतसंदेह : करिष्ये वचनं तव ||
“ माझा कर्तव्यमोह व संशय नष्ट झाला ; आता मी तुमच्या सांगण्याप्रमाणे करितो” अशी पावती घेतली आहे. ही पावती अर्जुनाने केवळ तोंडानेच दिली असे नाही, तर त्याप्रमाणे पुढे खरोखरच युद्ध करुन त्या प्रसंगोपात्त युद्धात भीष्म- कर्ण- जयद्रथादिकांचे वध केले आहेत. यावर कित्येकांचे असे म्हणणे आहे की अर्जुनास भगवंतांनी जो उपदेश केला तो निवृत्तिपर ज्ञानाचा, योगाचा किंवा भक्तीचाच असून तोच मुख्य प्रतिपाद्य विषय होय. पण युद्धाला प्रारंभ झाला होता म्हणून कर्माची मध्येमध्ये थोडीशी प्रशंसा करुन भगवंतांनी अर्जुनाला ते युद्ध पुरे करु दिले आहे. अर्थात युद्ध पुरे करणे ही गोष्ट मुख्य न धरिता आनुषंगिक किंवा अर्थवादात्मकच मानिली पाहिजे. पण अशा लटपटित कोटिक्रमाने गीतेच्या उपक्रमोपसंहाराची किंवा फलाची नीट उपपत्ति लागत नाही. स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेले कर्तव्य काही झाले तरी आमरणान्त करीत राहण्याचे महत्त्व व आवश्यकता याठिकाणी दाखवावयाची होती; व ती सिद्ध करण्यास वरच्यासारखे पोकळ कारण गीतेत कोठेहि सांगितले नाही आणि सांगितले असते तरी अर्जुनासारख्या बुद्धीमान् व चौकस पुरुषास ते पटलेहि नसते. भयंकर कुलक्षय होणार हे डोळ्यांपुढे दिसत असतांहि युद्ध करावे का न करावे , आणि करावे म्हटल्यास पाप न लागता कसे करावे, हाच त्याचा मुख्य प्रश्न होता; आणि कितीहि लटपट केली तरी “निष्काम बुद्धीने युद्ध कर” किंवा “कर्म कर” असे या प्रश्नाचे उत्तर.
उताऱ्याला प्रिंट करण्यासाठी खाली दिलेली इमेज डाउनलोड करून प्रिंट करा


