पाटिविअ चा दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा संपन्न !

“पार्ले टिळक सारख्या संस्था शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतात” असे गौरवोद् गार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. उदय सामंत यांनी काढले. पाटिविअ च्या शताब्दी सांगता सोहळ्यात ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेने गत वर्षी १०० वर्षे पूर्ण केली. शताब्दी सांगता निमित्त संस्थेच्या १०१ व्या वर्धापनदिनी म्हणजे ९ जून २०२२ रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. सकाळी झालेल्या सत्रात मराठी शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दल प्रमुख मा.श्री. प्रदीप नाईक (निवृत्त), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी भारतीय हवाईदल प्रमुख प्रदीप नाईक यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने आणि भाषणाने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. मराठी शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण केले आहे तसेच १०० वर्षांचा इतिहास डिजिटल स्वरुपात शाळेच्या लॉबीमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना संरक्षण दलात जाण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने शाळेत एक विशेष शौर्य कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या सर्वांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी सैन्यदलात कार्यरत असलेले आणि सैन्यदलातून निवृत्त झालेले मराठी शाळेचे अनेक माजी विद्यार्थी याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.

संध्याकाळच्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी, पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे उपस्थित होते. या वेळी शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. संस्थेच्या पार्ले येथील मराठी शाळेच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम झाला.

हा कार्यक्रम आपण पुढील लिंक्स वर क्लीक करून पाहू शकता. 

पाटिविअ दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा PTVA concluding ceremony of centenary

पाटिविअ दिमाखदार शताब्दी सांगता सोहळा भाग २ PTVA concluding ceremony of centenary Part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu