उत्कर्ष मंडळात ‘शहरी शेती’ कार्यक्रम संपन्न
स्वच्छ पार्ले अभियान , मराठी विज्ञान परिषद व उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी शेती वर्ग दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी उत्कर्ष मंडळाच्या सभागृहात झाला. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. दिलीप हेर्लेकर यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या वर्गाचा लाभ ७५ व्यक्तींनी घेतला. या कार्यक्रमाला डॉ. अलका मांडके, उत्कर्ष मंडळाच्या विश्वस्त सौ. गोरे तर ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ प्रा. चंद्रकांत लट्टू आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. सतीश कोळवणकर यांचा मुख्य सहभाग होता तर श्री. मंदार म्हात्रे, श्री. विपुल मेहता आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केले. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रकाशने त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होती, त्याला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.



