श्रीमती विद्या पेठे यांना तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे सन्मानचिन्ह आणि पुरस्कार प्राप्त.
पहिले तितिक्षा राष्ट्रीय साहित्य संमेलन ६ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे येथे संपन्न झाले, ज्याचे आयोजन तितिक्षा इंटरनॅशनल यांनी केले होते. त्याचबरोबर पुरस्कार वितरण सोहळा देखील पार पडला. या कार्यक्रमात पार्ले टिळक विद्यालयाच्या माजी माननीय शिक्षिका श्रीमती विद्या पेठे यांना तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे शैक्षणिक कार्यासाठी मानचिन्ह आणि त्यांच्या ‘कथा जनातल्या मनातल्या’ या पुस्तकाकरिता सन्मानचिन्ह व प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तितीक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन ही संस्था वृद्धाश्रमांना औषध पुरवणे, आरोग्य विषयक शिबिर भरवणे तसेच काव्य संमेलन, साहित्य संमेलन ,एकांकिका स्पर्धा यासारखे साहित्यिक कार्यक्रम पण राबवते. यासाठी श्रीमती विद्या पेठे यांचे टाउन ग्रुप (www.townparle.in) आणि समस्त पार्लेकर मंडळींतर्फे अभिनंदन !!!



