स्ट्रोक
उच्च उत्पन्न असलेल्या गटातील राष्ट्रांमध्ये, साधारणपणे स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे कारण ठरत आहे. मेंदूमध्ये विशिष्ट ठिकाणी रक्तवाहिन्यांच्या आत अडसर निर्माण झाल्यामुळे त्या भागाला रक्त पुरवठा होत नाही. तसेच प्रसंगी रक्तस्त्राव होऊन मेंदूच्या त्या विशिष्ट भागातील केंद्रे अकार्यक्षम होतात.
अशा स्ट्रोकमुळे मेंदूची जी केंद्रे अकार्यक्षम झालीअसतील, त्या केंद्रांचे व शरीराच्या अवयवांचे नियंत्रण असंतुलित होते. उदा: दृष्टी, वाचा, तसेच स्नायूंच्यातील शक्तिहीनता, संभ्रमित अवस्था, सुप्तावस्थेत जाणे, इ.
स्ट्रोकची कारणे आपण जर आधीच नियंत्रित केली तर स्ट्रोक येण्याचे टाळता येईल. आपल्या घरी, भोवताली तुम्हाला असे असंख्य लोक आढळून येतील जे रोज बीपी, डायबिटीस, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल च्या गोळ्या वर्षानुवर्ष घेत आहेत तरीही त्यांचे आजार बरे होत नाही. ह्या आजारांचे पुढे काय परिणाम होतील ह्या बाबतीत ते अनभिज्ञ असतात आणि त्या आजारपणाची त्यांना सवय झालेली असते.
नियमित रक्त तपासणी न केल्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव किती झाला आहे याचा अंदाज व्यतिकला येतच नाही. शेवटी आपले शरीर हे आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान दैवी देणगी आहे, त्याची योग्य निगा राखणे हे आपले पहिले कर्तव्य ठरते. त्यासाठी :
१. जेवणातील मीठ प्रमाण – लोणची, पापड कमी केले पाहिजे. बाहेरील पॅक्ड फूड मध्ये सोडियम चे प्रमाण खूप जास्त असते. आपल्या नकळत शरीरात अत्याधिक प्रमाणात सोडियम प्रवेश करत असते. उदा: बिस्कीट, पापड, लोणची, सौस, टेस्ट मेकर, रेडी टू ईट फूड्स, इ.
२. जेवणात स्निग्ध पदार्थांच्या अति सेवनामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते आणि चरबीचे थर निर्माण होऊ लागतात, तसेच रक्त वाहिन्यांच्या मध्ये ब्लॉकेज/ अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे हार्ट डीसीसीएस निर्माण होतात जसे कोरोनरी आर्टरी डीसीस, जेणेकरून हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे हार्ट पेशंट मध्ये स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. त्यासाठी आपला आहार संतुलित असला पाहिजे. दिवसभरातील व्हिसिबल फॅट्स ( तेल, तूप, बटर) ह्यांचे सेवन २२ ग्रा किंवा ४ टी स्पूनच्या वर नसले पाहिजे. पूर्वी एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या व्यक्तीमध्ये स्ट्रोक येण्याची संभावना जास्त असते, त्यामुळे त्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते.
३. बाहेरचे जंक फूड्स, परत परत तळेले तेल, तेल उघडे ठेवणे, धूर निघेपर्यंत तेल तापवून फोडणी करणे, ह्या सर्व कारणांमुळे तेलात ट्रान्सफॅट्स निर्माण होतात. जे आपल्या शारीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करते. हे कमी करण्यासाठी नियमित व्हिटॅमिन C – लिंबू, संत्र, मोसंब, आवळा, पेरू, लाल टोमॅटो, इ. तसेच व्हिटॅमिन e – अंडी, ड्राय फ्रुट्स, नट्स, सोया, मासे, इ. पदार्थांचे सेवन करणे व रोज नियमित व्यायाम कारणे आवश्यक आहे.
४. आहारात कार्बोहैड्रेट्स चे प्रमाण योग्य असणे अनिवार्य आहे. जास्त प्रमाणात कार्ब्स घेऊन व शरीराची मेहनत कमी असल्यामुळे टाईप २ डायबिटीस निर्माण होते. दिवसभरात गोड़ पदार्थांचे, साखरेचे प्रमाण नियंत्रिक असणे गरजेचे आहे. सर्व रसांनीयुक्त असा संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.
५. सिगारेट, उत्तेजक पेयांच्या अति सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्ट्रोक चे प्रमाण जास्त आढळते ह्याचे कारण रक्त वाहिन्यांची लवचिकता नष्ट होते. अशा व्यक्तींनी अत्याधिक काळजी घेऊन स्वतःवर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. व रोजच्या आहारात ताजी फळे, भाज्या, लोह, प्रोटेइन्स यांचा समावेश असला पाहिजे.
६. तुमच्या परिवारात, नातेवाईकांमध्ये (तुमच्या आई किंवा वडिलनकडून) जर कोणाला स्ट्रोक येऊन गेला असेल तर तुम्ही स्वतःची अत्याधिक काळजी घेणे अपरिहार्य ठरते.
वरील सर्व बाबींचा गांभीर्याने जर विचार केला तर स्ट्रोक येण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. असे आढळून आले आहे कि नियमित होमिओपॅथीक औषधे घेणाऱ्या व्यक्तींमध्ये गंभीर आजार उत्पन्न होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तुम्ही वेळेत छोट्या-छोट्या दिसणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, विहार, नियमित व्यायाम व होमिओपॅथिक औषधोपचार करून आपल्या जीवनाचा उत्तम प्रकारे उपभोग घेऊ शकता.
– डॉ. शरयू राजवाडे (Homoeopathy | Diet & Nutrition | Trichology | Skin & Aesthetics | Yoga & Fitness)
व्हॉटसप्प : ८४२४८००२४७
Dr Sharayu R
PC:google

