फोटो फिचर – बदलते पार्ले
पार्ले ते अंधेरीच्या मार्गाने हायवे वरून जाताना हल्ली बऱ्याच जणांचे लक्ष हॅप्पी होम सोसायटीच्या मागील बाजूच्या भिंतींवर अडखळते याचे कारणही तसेच आहे. बयूटीफिकेशन ऑफ पार्ले या मोहिमेअंतर्गत आमदार ज्योती आळवणी यांच्या निधीतून तिथे बदलत्या पार्ल्याची अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांकडे पाहताना आपण जणू जुन्या आठवणीतल्या पार्ल्यातूनच फेरफटका मारत आहोत असा भास होतो.
या चित्रांमध्ये पार्लेश्वराचे देऊळ, जुने टिळक मंदिर, पार्ले टिळक शाळा, जुना मोर बंगला, पार्ल्यातील जुनाट वळणाची घरे , पार्ल्याच्या एरिअल व्ह्यू , आणि अशी बरीच छान छान चित्रे पाहायला मिळतात.
नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ पार्ले अभियान, आमदार निधीतून होणारे पार्ल्याचे ब्युटिफिकेशन , नागरिक दक्षता विभागांचे कार्यक्रम आणि आपले सुसंस्कृत पार्लेकर यांच्या साऱ्यांमुळे पार्ल्याची शान अजूनच वाढत आहे.
यापैकी काही प्रकल्पांचे फोटो फिचर येथे देत आहोत.
