नखांवरचे पांढरे  ठिपके

नखांवर पांढरे ठिपके येणे हे लक्षण खूप लोकांमध्ये आढळून येते. बऱ्याच लोकांना ह्याचा अर्थही माहित असतो – कॅल्शिअमची कमतरता. परंतु हे लक्षण असलेल्या पेशंट्सचे जेव्हा कॅल्शिअमसाठी रक्त तपासण्यात येते तेव्हा त्याची पातळी नॉर्मल असते. म्हणजेच कॅल्शिअम रक्तामध्ये कमी नाही आणि तरीही हे पांढरे ठिपके नखांवर आढळून येतात. मग येतो प्रश्न व्हिटॅमिन डी चा. काही पेशंट्स मध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता रक्ताच्या तपासणीत दिसून येते आणि काही लोकांचे व्हिटॅमिन डी सुद्धा नॉर्मल असते.

आता एवढे सगळे नॉर्मल असूनही नखांवर पांढरे ठिपके येतच असतात. हे का? होमिओपॅथी सूक्ष्म पातळीवर प्रत्येक घटकाचा अभ्यास करते. ज्या लोकांच्या नखांवर वारंवार पांढरे ठिपके अगदी लहानपणापासून येतात अशा लोकांमध्ये कॅल्शिअम चे प्रमाण शरीरात योग्य असते परंतु त्याचे असीमिलेशन नीट होत नसते. म्हणजेच शरीराला प्रत्येक घटक एका विशिष्ट रूपात हवा असतो जेणेकरून तो योग्य प्रकारे आतड्यांमधून शोषला जाईल व त्याचा गरजेनुसार वापर करता येईल. असीमिलेशन नीट न झाल्या मुळे कॅल्शिअम शरीरात भरपूर असूनही त्याचा योग्य रूपात योग्य ठिकाणी वापर होत नाही.

अशी मुले / तरुण / वृद्ध कल्केरिया ग्रुप मध्ये आढळतात. कॅल्शिअम हे आपल्या शरीराच्या अस्थींमध्ये सापडते. त्यामुळे कॅल्शिअम शरीराचा आधारस्तंभ आहे. हा धातू योग्य रूपात न मिळाल्यामुळे ह्या कल्केरिया लोकांच्या नखावर वारंवार पांढरे ठिपके येतात. लहानपणी ही मुले स्थूल असून त्यांचे पालथे पडणे, रांगणे, चालायला शिकणे, दात येणे हे उशिरा असते किंवा क्रमाने नसते. स्नायू शिथिल असून शरीराचा बांधा फ्लॅबी असतो, पोट सुटलेले, हातांचे तळवे मऊ, मांसल असतात जणू अस्थी नाहीच. त्यांना प्रचंड घाम येतो व त्यांच्या शरीराला जास्त वेग घेता येत नाही. हळू काम करणे, आरामात काम करणे, जागेवर बसून काम करणे, शरीराला फारसे कष्ट न देणे, सर्दी / खोकला वारंवार होणे, विविध ग्लॅण्डसचे रोग होणे, रक्त वाहिन्या शिथिल असल्यामुळे वेरिकोस व्हेन्स उतरत्या वयात होणे, अश्या काही तक्रारी आढळतात.

मानसिक पातळीवर त्यांना सतत आधार हवा असतो. तो आधार ते आपल्या आई – वडिलांमध्ये शोधतात. त्यांचा मित्रपरिवारही मोजका असतो. त्यांना बदल नको असतो. जर लहानवयात माता/पिता पासून लांब राहिले किंवा निधन झाले तर ते खचतात. ज्यांचा त्यांना आधार जाणवतो अश्या व्यक्तींपासून दूर होण्याची कल्पना त्यांना बेचैन करते. मनाने अगदी मऊ असलेली ही माणसे आता कृत्रिम टणक बनायला लागतात, स्वतःच्या कोषात जातात.

माझ्या पुढ्यात बसलेली एक कैल्केरिया फॉस पेशंट नेहमी डोळ्यासमोर उभी राहते. तिने तिचे आई – वडील उत्तराखंडला झालेल्या ढगफुटीत गमावले होते.

ह्या पेशंट्सची संपूर्ण केस घेतल्यावर जेव्हा त्यांना कल्केरिया ग्रुपचे औषध देण्यात येते तेव्हा फॉलो – अपला आलेली ती व्यक्ती अजून बहरलेली असून, परत मृदू आणि आधीपेक्षा जास्त कॉन्फिडन्ट जाणवते. आणि नखांवरचे पांढरे ठिपके? ते तर गायब होतात .. !

– डॉ शरयू राजवाडे : डाएट | फिटनेस | होमिओपॅथी
मुंबई.
फक्त व्हॉटसप्प : ८४२४८००२४७
Whatsapp for booking your appointment.
HIT LIKE AND FOLLOW @ Dr Sharayu R

Image source: Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu