पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम मधील इयत्ता ४ थी मध्ये शिकणारा प्रणय प्रशांत (प्रीति) पास्टे याची नेपाळ येथील कराटे स्पर्धेत दमदार कामगिरी
पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम मधील इयत्ता ४ थी मध्ये शिकणारा प्रणय प्रशांत (प्रीति) पास्टे याने दिनांक 25 मे थे 27 मे 2022 रोजी नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये दहापेक्षा अधिक देशाने आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये प्रणय प्रशांत (प्रीति) पास्टे याने कराटे मधील विविध इव्हेंटमध्ये सहभाग घेऊन आपल्या भारत देशाला 1 सुवर्ण पदक 3 रौप्य पदक 3 कास्य पदक अशा एकूण 7 पदकाची दमदार कमाई त्यांनी केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारत देशाचे व पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन तसेच पार्ले टिळक मराठी विद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे. या स्पर्धेसाठी तयार करणारे प्रशिक्षक श्री अरविंद चव्हाण, श्रीमती विभावली सापळे अशा आंतरराष्ट्रीय पदक विजेते व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.




