लोकमान्य सेवा संघातर्फे नाविन्यपूर्ण संगीत मैफिल – नादब्रह्म

दिनांक १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता लोकमान्य सेवा संघाच्या माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे ‘नादब्रह्म’ या नाविन्यपूर्ण संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम लोकमान्य सेवा संघाच्या सावरकर पटांगणावर होईल. 
कार्यक्रम पुढील प्रमाणे :
१. देवकी पंडित यांचे शास्त्रीय संगीत गायन 
हार्मोनियम – निरंजन लेले / तबला – मंदार पुराणिक 

२. स्वीकार कट्टी व त्यांचे बँड कलाकार 
सितार – स्वीकार कट्टी / तबला – याती भागवत 
ड्रम्स , शिखरनाद कुरेशी / कीबोर्ड – आदिनाथ पातकर 
 
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि तरुणाईच्या पाश्चिमात्य संगीत कलाविष्काराचा आनंद सर्व वयोगटातील संगीत प्रेमी रसिकांना एकाच मैफिलीत घेता यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. 
Main Menu