लेख दुसरा : चला प्रतिकारशक्ती वाढवूया !

नमस्कार पहिल्या लेखात आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय हे समजून घेतलं आणि शरीरासाठी  आवश्यक पोषणद्रव्ये कुठली,  ती देणारे अन्नघटक कोणते ,हे ही पाहिलं.  आता पुढे !

काही अन्नघटक असे असतात कि ते  ऊर्जा व पोषणद्रव्ये तर देतातच पण आणखीही बरेच फायदे करून देतात. जसे की –  काही रोगांना अटकाव करणे, आजारातून लवकर बरे करणे,काही शारीरिक व्याधी नियंत्रणात ठेवणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणे. ह्या खास अन्नघटकांना ‘कार्यसाधक (Functional) अन्नघटक’ असे म्हणतात.  या लेखात मी अशाच काही खास प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांबद्दल सांगणार आहे.
  

लिंबू : आपल्या सुपरिचित लिंबा मध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. सध्याच्या परिस्थितीत उपयुक्त गुणधर्म हा लिंबू रोगप्रतिकारशक्ती बळकट करते .  त्याचबरोबर लिंबातील जीवाणू विरोधी (Antibacterial) आणि विषाणू विरोधी (antiviral) गुणतत्वे शरीराला सर्दी-तापाशी  लढायला मदत करतात.  लिंबात असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘क्वरसेटिन (Quercetin)  हे बायोफ्लॅवेनॉइड (bioflavonid)  यामुळे रोगप्रतिकार यंत्रणेला चालना मिळते. 
लसूण : पुराणकाळापासून जगभरात लसणाचा वापर नुसता खाद्यपदार्थ म्हणून नव्हे तर एक औषधी तत्व म्हणूनही केला गेला आहे.  लसणामध्ये  रोगप्रतिकार यंत्रणा नियंत्रित करणारी  अनेक जैविक रसायने असतात.  त्यांचे इतरही अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात.  लसणामध्ये सर्वात जास्त सक्रिय असतो ऍलिसीन (Allicin) नावाचा जैविक घटक जो लसणाला   निसर्गाचा कीटकनाशक ही उपाधी बहाल करतो.  लसूण  ठेचुन पंधरा मिनिटे तसाच ठेवावा व मगच वापरावा.  त्यामुळे त्यात एन्झाइमची  एक साखळी  प्रक्रिया सुरू होते, जिच्यामुळे ऍलिसीन व आरोग्याला हितकारक असणारे इतर घटक सक्रिय होतात. 


हळद व मिरी :
  हळदीमधील कर्क्युमिन हे रसायन हळदीला औषधी गुणधर्म देते. ते  अत्यंत गुणकारी असते.  पण दुर्दैवाने ते  शरीरात सहजपणे शोषले जात नाही. मिरीमधल्या “पिपेरीन”  या जैविक घटकाची खासियत अशी की तो शरीराची कर्क्युमिन
शोषून घेण्याची क्षमता अनेक पटींनी वाढवतो!  हळदीमधले  करक्यूमिन आणि मिरीमधले पिपेरीन यांच्या एकत्रित दाहविरोधी (anti- inflammatory)अँटिऑक्सिडेन्ट व प्रतिकारशक्ती वर्धक गुणांमुळे आरोग्य सुधारते असे दिसून आले आहे. 

आवळा : 
‘आयुर्वेदातील आश्चर्य’ मानला जाणारा आणि निसर्गाने माणसाला निरामय , आरोग्यसंपन्न जीवनासाठी दिलेली मोठी भेट आहे. ‘क’ जीवनसत्वाचे सर्वाधिक प्रमाण आवळ्यात असते. संत्र्यापेक्षा २० पट जास्त  अँटिऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असणारा आवळा पचनापासून (digestion) उत्सर्जनापर्यंत (elimination) सगळ्याच शारीरिक प्रक्रियांसाठी हितकारक असतो , शिवाय प्रतिकार्शक्तीवर्धकही असतो.  

तुळस :
 
जगभरातील सर्वोत्कृष्ट वनौषधींपैकी एक म्हणजे तुळस. तुळशीमधील फायटोकेमिकल्स, बायोफ्लॅव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडेन्ट द्रव्यांमुळे तुळस श्वसनसंस्थेच्या विकारांवरचे अतिशय प्रभावी व गुणकारी औषध आहे. तुळशीच्या पानांच्या रसामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेतील महत्वाच्या ‘(T Helper)’ पेशी व (Natural Killer )पेशींना उत्तेजना मिळते व त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.    
 

गीतांजली चितळे
PGD Dietetics
MSC Nutrition
Mob: 9870422232
Email : geetanjali@cultiweight.com

Web: www.cultiweight.com    

Pc: google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu