ध्रुवा महोत्सवात पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमाची अव्वल कामगिरी
मुलुंड येथील वझे महाविद्यालयात २३ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ध्रुवा या संस्कृत महोत्सवात पार्ले टिळक विद्यालयाच्या (इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांनी शालेय गटात प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली आहे. या महोत्सवात त्यांनी नृत्य, नाट्य , गायन , स्मरणशक्ती , ट्रेजर हंट , अंताक्षरी , जाहिरात बनवणे इ. ११ प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन ४ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेतील संस्कृत शिक्षक डॉ. श्रीधर अय्यर व विज्ञापना गोकर्णकर यांचे या मुलांना मार्गदर्शन लाभले.
