पार्ले वॉकथॉन
पिंकेथॉन , मॅरेथॉन यांचे क्रेझ तरुणाईत असतानाच खास जेष्ठ नागरिकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रातर्फे ‘जेष्ठांसाठी पार्ले वॉकथॉन’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जेष्ठ नागरिकांसाठी २२ जानेवारी २०१७ रोजी २ व ३ किलोमीटर अंतरासाठी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ७ वाजता सावरकर केंद्र (सनसिटी) येथून होणार आहे . या कार्यक्रमाला पार्ले महोत्सव , कौंतेय प्रतिष्ठान, सोहम प्रतिष्ठान आय ऍक्ट इ संस्थांचेही सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेचे विनामूल्य अर्ज सावरकर केंद्र व पार्ले महोत्सव ऑफिस येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शरद पटवर्धन : ९८२०९५७२४५
वेळ : सकाळी १० ते १२ , सायंकाळी ६ ते ८
