विलेपार्ले येथील पहिल्या ऑनलाईन इ-क्लिनिकचे ऑनलाईन उदघाटन – १६ ऑगस्ट २०२०
विलें पार्ल्यातील पहील्या ऑनलाईन इ-क्लिनिकचे 16 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता वेबिनार द्वारे उदघाटन
सध्याच्या covid-19 च्या वैश्विक महामारी च्या काळात आपणा सर्वास गरज आहे ती तज्ञ वैद्यकीय सल्ल्याची.
पण बराच वेळा घराबाहेर पडून दवाखान्यात जाऊन स्वतःची तब्येत दाखवणे हे धोकादायक वाटते अशा वेळेस जर आपणास तज्ञ वैद्यकीय सल्ला घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईल वरूनच मिळाला तर तो जास्त सोयीस्कर होऊ शकतो. येत्या 16 ऑगस्ट 2020 रोजी डॉक्टर रमेश प्रभू व डॉक्टर पुष्पां ताई प्रभू ह्याच्या स्मृती प्रित्यर्थ डॉक्टर प्रभूज पॉल इ क्लिनिक चे उदघाटन वेबिनार द्वारे त्यांचे सुपुत्र श्री अरविंद प्रभू तसेच इतर सर्व तज्ञ डॉक्टर ह्यांच्या उपस्थितीत होणार आहे. ह्या ॲप बेस्ड क्लिनिक द्वारे आपण आमच्या पॅनल वरील विविध तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घरी बसून घेऊ शकता. अचूक निदान व योग्य वैद्यकीय सल्ला तसेच ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन अश्या सोयी ह्या मोबाईल अँप्लिकेशन मध्ये समाविष्ट केल्या आहेत तसेच आपण आपल्या तज्ञ डॉक्टर सोबत फोन वर व्हिडिओ द्वारे किंवा साधे ही संभाषण करू शकता. आपण आपले लॅब रिपोर्ट्स तसेच इतर रिपोर्ट तज्ज्ञांच्या अभ्यासासाठी ह्यावर लोड करू शकता.
आपली वैद्यकीय माहिती ही अतिशय गुप्त राखली जाते व त्याची जपवणूकही केली जाते जेणेकरून पुन्हा जेंव्हा सल्ल्याची गरज भासेल तेंव्हा वैद्यकिय तज्ञ त्याचा अभ्यास करू शकतात.
श्री अरविंद प्रभू सांगतात की
ह्या व्यतिरिक्त दूरध्वनीवरून वैद्यकीय समुपचारासाठी व मदतीसाठी ऐका तज्ञ व्यक्तीचीही नेमणूक केली जाणार आहे ,अशी व्यक्ती जी आपणास आमच्या वैद्यकीय तज्ञसोबत च्या ऑनलाईन भेटी पूर्वी व नंतर समुपचार करू शकेल.
आपल्या ह्या इ क्लिनिक च्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पॅनल वर खालील प्रमाणे तज्ज्ञांना समाविष्ट केले आहे.
1 फिजिशियन व मधुमेह तज्ञ
2 स्त्री रोग तज्ञ
3 नाक कान घसा तज्ञ 4 नेत्र विकार तज्ञ
5 लैंगिक समस्या तज्ञ
6 बाल रोग तज्ञ
7 त्वचा विकार तज्ञ
8 अस्थिरोग तज्ञ
9 मणक्याचे विकारांचे तज्ञ
10 मनोविकार तज्ञ
11 पोटाच्या विकाराचे तज्ञ
12 आयुर्वेद तज्ञ व योगाभ्यास तज्ञ
13 होमिओपॅथिक तज्ञ
14 फिसीओथेरपिस्ट
15 आहार तज्ञ
16 स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञ
17 शल्य चिकीत्सा (सर्जन ) व चाईल्ड सर्जरी तज्ञ.
इत्यादी…
ह्या सेवेचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन श्री अरविंद प्रभूंनी केले आहे.
डॉ प्रभूज पॉल इ क्लिनिक च्या मोबाईल ॲप ची लिंक मिळवण्यासाठी विविध पर्याय आहेत जसे की ptks connect व डॉ प्रभूज पॉल इ क्लिनिक चे फेसबुक अकाउंट तसेच इन्स्टाग्राम व ट्विटर अकाउंट वरून ही लिंक मिळेल किंवा आपण 8830064396 ह्या व्हाट्सएपच्या क्रमांकावर लिंक (link) असे टाईप करून संदेश पाठवल्यास आपणास त्वरित आपल्या व्हाट्सएप वर ही लिंक मिळेल.
वरील उद्घाटन सोहळ्यात आपण ज्यास्तीत ज्यात संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री अरविंद। प्रभू ह्यांनी केले आहे. पी टी के एस कनेक्ट च्या फेसबुक पेज वर ह्याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.
अरविंद रमेश प्रभू
pc:google

