पारल्याच्या इतिहासावर नवीन पुस्तक
मुंबई उपनगरीय इतिहासावर एका इतिहास अभ्यासकाने लिहिलेले पहिले पुस्तक लवकरच आपल्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक विलेपारले आणि जुहूच्या इतिहासावर शास्त्रशुद्ध व विस्तृतपणे चर्चा करणारे आहे. इतिहास अभ्यासक- लेखक संदीप दहिसरकर यांच्या विलेपारले हेरिटेज वॉक ते या नवीन पुस्तकाच्या प्रवासात पारल्याच्या अज्ञात ऐतिहासिक विषयांवर नवीन माहिती संग्रहित करण्यात आली आहे. ऐतिहासिक लेखनाबरोबर यात जून्या व नवीन पारल्याच्या छायाचित्रांचा समावेश देखील करण्यात आला आहे.
पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झाली असून खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधून आपण आपले पुस्तक विकत घेऊ शकाल.


