गावपळण..

सकाळीच आबा घाडी आणि गणु काका खोत रामेश्वरच्या मंदिरात जावुन बसले.पुजारी पूजा करीत होता.आबा घाडी पाटलांची वाट बघत होते.का कुणास ठावुक पणं हळुहळु सारे गावकरी रामेश्वरच्या मंदिरात जमले.कोणी पान तंबाखु चघळीत गजाली मारीत होते.पुजारी खोबऱ्याचा तुकडा घेऊन बाहेर

आला.खोबऱ्याचा तुकडा गणु काकांच्या हातावर ठेवित म्हणाला काय यो काकांनु, आज सकाळीचं इलास कायं काम असा!गणु काका तसे गावचे खोत व प्रतिष्ठीत व्यक्ती.ते म्हणाले,अरे गावपळणीचो दिवस जवळ येता म्हणुन सकाळच्याक इलांव कौल लावुचो लागातं ना पाटलाची वाट बघतावं!;तु तयारी करुक घी!श्याम पाटील धोतराच्या निऱ्या पकडीत पाटलाच्या रुबाबात चालत येते होते.हळुहळु गावातील मानकरी सुद्धा जमा झाले.पुजाऱ्याने कौल लावला. दुपारचे बारा वाजले होते.सारा गांव शांत होता.आणि एकाएकी कौल मिळाला.तसा पुजारी धावत बाहेर आला व म्हणाला,पाटलांनो कौल मिळालो!देव रामेश्वरानं कौल दिलानं!उशीरा का व्होयनां पण कौल मिळालो!गणु काका दबक्या आवाजात बोलले.तसा रामा बोलला,या माञ एकदाम खरा बोललास हा खोतांनु!"अहो गावह्राटीतील गावपळणं ती पाळुकचं व्होयी.पुजाऱ्याने गाह्राणे सांगितले.पाटलानी रामाला गावभर दवंडी पिटवायला सांगितली.

गावपळण हि साधारणत:देवदिवाळी किंवा महाशिवराञीच्या आसपासं येते.आपल्या पुर्वजाने दिलेला शब्द आसतो व तो पाळावा लागतो.असा समजं आहे.दर तीन वर्षांनी गावह्राटितील गावपळणं येते.या दिवशी सारा गावं पुढचे तीन दिवस गावाच्या चतु:सिमेच्या बाहेर राहतो.गावात कोणीच थांबत नाही. शाळांनाही सुट्टया असतात.या विषयी अनेत आख्यायिका कोकणात ऐकायला मिळतात.)पुर्ण गावात दवंडी पिटवली गेली.गावपळणीला अजुन दोन दिवस बाकी होते.गणु काका खोत,श्याम पाटिल,आबा घाडी व इतर गावकरी पारावर बसुन चर्चा करायला लागले.रामा कासार बोलला,काय यो पाटलांनो या वर्षाक देवानं जरा कौल उशीरानं दिल्यानं न्हाय म्हणे या आधी असा कधी घडला न्हाय!;व्हाता रे असा कधीतरी पण या पुढे सर्वानी काळजी घेवुक व्हयी,न्हाय म्हणे मागच्या गावपळणीक काय झाला,माहिती असा ना!त्यामुळे या वर्षाक गावांत यक बी मानुस रव्हतां नये,कसां!!सर्वानी दुजोरा दिला.

मागच्या गावपळणीला गावातील दोन इसम चुकुन मागे राहिले होते.त्यांच्या सोबत घडलेल्या घटनांमुळे आज त्या दोघांच्याही डोक्यावर परिणाम झाला.ना कोणाशी बोलतं ना काही सांगत देवदेवस्की करुन झाली.कौल लावुन झाला पण काहीच उपयोग झाला नाही.त्या वर्षी गावात काही शहरी पोर रमा काकुंकडे राहिला आली होती.तसे पाहुणेच होते;पण गावपळण म्हणजे काय हे त्यांना सुद्धा बघायचे होते.त्यामुळे ते सुद्धा खूप उत्सुक होते.गावपळणीला एक दिवस शिल्लक होता.सारा गाव हातातली कामे सोडून आपापली कामे लगबगीने आटपतं होता.शाळकरी विद्यार्थी सुद्धा सुट्टी असल्याने खुप आनंदीत होते.खेळायचे साहित्य सोबत घेऊन ते गावभर फेरफटका मारीत होते.दिवस डोक्यावर आलां तरी गोंधळ काही कमी होत नव्हता.गावातील बायांची विहिरीवर पाणी भरण्यासाठी रेलचेल चालु होती.रमा काकू खाण्याचे जिन्नस भरतं होत्या.ती शहरी पोर सुध्या आपापले सामान आवरतं होती.साऱ्या गावाला छावणीचे स्वरूप आले होते.जणु कोणी गाय वासरु बांधीत होता.तर कोणी अजु काही करीत होता.हळुहळु सुर्य मावळतीला लागला.संध्याकाळची शेवटची लाल गाडी निघुन गेली.श्याम पाटिल,रामा कासार,गणप्या कोळी,गणु काका खोत पारावर बसुन चकाट्या पिटतं होते.अरे गणप्या गाडींसुन कोण उतरला काय रे!"व्होय सा वाटतां. येवढ्यात गणपत पालकर गाडीतुन उतरून पाराजवळ आला.काय रे काय झाला? म्हंजे तुका कळुक नाय अरे उद्यापासुन गावपळणं असा इलसं ता बरा केलेसं." पालकरांनी थोड्यावेळ गप्पागोष्टी केल्या,व ते निघुन गेले.काळोख पडला तसे सर्वजण आपापल्या घरी मार्गस्थ झाले.सारां गाव शांत होता.आणि तो दिवस उजाडला.पहाटेपासुनच सर्वजण कामाला लागले.पारावर सारा गांव जमा झाला.गाय वासरे,बकऱ्या,शेळ्या घरगुती वस्तु सर्वकाही सोबत होते.श्याम पाटिल बोलायला उभे राहिले.कायं रे रामा कोण ह्रवलां काय?न्हाय पाटलांनो!सारा गांव जमा झाला होता.गावची वस्ती तशी ४०० च्या आसपासं.पहाटेचे ५:३०वाजले होते.गावपळणीला सुरवात झाली.रामा कासार ढोल वाजवीत पुढे चालला होता.

सारा गाव वेशीच्या बाहेर पडला.धनगरांच्या माळरानावर वस्ती केली होती.छावणीचे स्वरुप पुर्ण माळरानाला आले होते.तंबु उभारण्याचे काम चालु झाले . चुली मांडल्या गेल्या.पारावर अनेक जणं गप्पागोष्टी करीतं होते.ती शहरी मुलेे सुद्धा त्यांच्यांत सामील झाली.श्माम पाटिल त्यांना गावपळणीचा इतिहास सांगत होते.कि,हि प्रथा ३०० वर्षापासुन चालु हा!आमच्या पुर्वजानं शब्द दिल्यानं व्होतो!या दिवशी गावात प्रेतआत्मा यांचो वावर असतां!त्यामुळे गावातं कोण रव्हंत न्हायं!!असे किहितरी ते सांगत होते.त्या शहरी मुलांना त्यामागील सत्य जाणुन घ्यायचे होते.या गावातं राञीचे काय घडते.कोण असते हि कथा खरचं आहे कि अजुन काही.त्या शहरी मुलांनी गुपचुप राञी गावात जाण्याचा बेत आखला.एक जण बोलला की कशाला उगाच विषाची परीक्षा त्या पेक्षा नको.पण शेवटी जायचे ठरले.हळुहळु पश्चिमेकडे अंधार पडु लागला,तसे सारे जण आपल्या तंबु शेजारी पोहचले.राञीचे ८वाजले होते.रमा काकुंनी मस्तपैकी माश्याचे कालवण केले होते.सर्वजण मनसोक्त जेवले.यांच्यां मनात काय आहे,हे रमा काकुंना सुद्धा माहित नव्हते.सारा गांव शांत झोपलेला पाहून रात्री  बाराच्या दरम्यान चौघेही हळुच वस्तीच्या बाहेर पडले.गावातील घरे आता त्यांना दिसु लागली.सारा गांव भकास व विराण दिसत होता.नाही म्हणायला पारावरचा दिवा तेवढा पेटलेला दिसला.ते हळुहळु गावात शिरले.रातकिडे किर्र किर्र करत होते.गावात प्रवेश करताच एकाएकी वाऱ्याचा वेग वाढला.तसे शेजारील घराच्या खिडकिचे दार कर्र आवाज करित बंद झाले. त्यांनी रमा काकूंच्या घराची चावी गुपचुप आणली होती.ते चौघेही आता पाराजवळ आले.

सभोवतालचे वातावरण फार भितीदायक बनले होते.आणि हि भिती त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होती.वस्ती खुप मागे राहिली होती.एवढ्यात त्यांना कोणाच्यातरी चालण्याचा आवाज ऐकु आला.राञीच्या त्या काळ्याकुट्ट अंधारात त्यांना कोणीच दिसतं नव्हते.फक्त परत जा परत जा!असा आवाज कानी ऐकु येत होता.आवाजात थोडा घोगरेपणा होता.त्यांनी आवाजाच्या दिशेने जावून बघीतले,तर दुरुनच एक आकृती राञीच्या त्या अंधारात गुडुप झाल्याची त्यांनी पाहिली.आपण इथे येऊन फार चुक केली.असे आता त्यांना वाटु लागले.पण,परत जाण्याचे सर्व मार्ग आता बंद झाले होते.सोसाट्याचा वारा सुरु झाला.घडणाऱ्या घटना अनपेक्षित होत्या.धुक्याचे लोट दुरवर वाहत होते.त्यातुनचं दोन इसम त्यांनी जवळ येताना पाहिले.ते दिसायला फारचं कुरूप दिसत होते. हातापायांची नखे वाढलेली होती.केसांमध्ये प्रचंड प्रमाणात जटा झाल्या होत्या.हे सर्व पाहताचं क्षणी त्यांची तर दातखिळीचं बसली.त्यांनी वेळीच सावरुन तेथून पळ काढला.पाटिल आपल्याला सांगत होते;ते खरे आहे.

आपण त्यांचे एकायला हवे होते.असे त्यांना वाटू लागले.पण,मिळेल त्या वाटेकडे पळण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.कसेतरी ते रमा काकुंच्या घरापर्यंत पोहचले.शेजारील विहिरीवरचे रहाट गरागरा फिरत होते.बाहेर चप्पल भिरकावून ते तसेच घरात शिरले व त्यांनी दार गच्च लावून

घेतले.समोरील दृष्य पाहण्याखेरीज त्यांच्या जवळ पर्यांय नव्हता.त्यात लाईट सुद्धा गेले होते.अचानक त्यांच्या समोरील खिडकी उघडली गेली.एकाने हळूचं जवळ जावुन पाहिले,तर त्या खिडकी समोर एक स्ञी आपले केस सोडून उभी होती.तीचे ते रुप फारचं भयानक होते.समोरील दृष्य बघुन तो तसाच खाली
कोसळला.त्याची तर वाचाच बसली होती.तो नुसतेच हात वारे करुन पुढे इशारा करीत होता. साधारण:राञीचे १:३०वाजतं आले होते.एवढ्यात त्यांना बाहेरुन जोरजोरात ढोलताश्यांचा व देवळातील घंटेचा आवाज कानी ऐकू आला.बाहेर माञ कुणीच दिसतं नव्हते.घरातील भांडी सुद्धा जोरजोरात वाजतं होती.घराच्या छपरावर जोरजोरात दगड फेकल्याचा आवाज येत होता.कोणीतरी अदृष्य शक्ती त्यांच्या मागे फिरत होती.सारा प्रकार फारचं भितीदायक होता.त्यांची तर बोलतीच बंद झाली.बाहेर अनेक पिशाच्च त्यांचा काळ बनून उभी होती.सोसाट्याच्या वाऱ्याने समोरील दरवाजा उघडला गेला.तसे या चौघांना

कोणितरी फरफटत बाहेर घेऊन जावु लागले.अक्राळविक्राळ ओरडण्याचा आवाज कानी येत होता.ते सुद्धा वाचवा वाचवा म्हणुन ओरडत होते.पण समोर एकणारे माञ कोणिच नव्हते.तो त्यांचा शेवट होता.

पहाटेला कोंबडा आरवला तसे सारे गाव जागे झाले.व हळुहळु हे नसल्याची बातमी साऱ्या वस्तीमध्ये पसरली.श्याम पाटिल खुप चिंतेत होते.साऱ्यावस्ती मध्ये भयाण शांतता पसरली.गावात सुद्धा जाता येत नव्हते.पुढील दोन दिवस आसपासच्या परिसरात शोधाशोध झाली.पण काहिच हाती लागले नाही.गावपळणीचे दिवस संपले,तसे सारे गावकरी गावाकडे धावले.तर गावाच्या वेशीवरचं हे चौघेही मृतावस्थेत सापडले.काळाने त्यांच्यावर झडप घातली होती.सारा गाव शोकाकुळ होता.(ते दोघे वेडे जोरजोरात हसतं होते.)त्यांचा अंत्यविधी गावातचं करण्यात आला.एवढ्या वर्षातून घडलेली हि दुसरी घटना होती.सारे गावकरी मिळून रामेश्वरच्या मंदिरात जमा झाले.देव रामेश्वरला माफिचे गाह्राणे घातले गेले. कोकणातील गावऱ्हाटी तशी फार मोठी व समजण्याच्या पलिकडली.याचं गावह्राटीमध्ये येते गावपळण… कोकणातील प्रामुख्याने वैभववाडी तालुक्यातील शिरोळे या गावी.मालवण तालुक्यातील आचारा,मौजे,चिंदर या गावी व निसर्ग सौदर्यंतेने नटलेल्या वांयगणी या गावी,आजदेखील गावपळण दर ३ वर्षांनी पाळली जाते.आज अनेक गावातील गावह्राटी बंद पडल्या आहेत.

गावकऱ्यांचे वाद असतील किंवा मानकऱ्यांचे मान असतील.पण तरीदेखिल कोकणातील गावह्राटी आजसुद्धा कुतुहलाचा विषय आहे.पणं गावह्राटीतील गावपळणीमागे खरच काही सत्य आहे कि अजुन काही हे माञ गुपित आहे…

 
लेखक: विश्वजीत चिरपुटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu