‘आम्ही पार्लेकर’ संपादकीयांचे निवडक लेख आता पुस्तक स्वरूपात – २२ सप्टेंबरला प्रकाशन सोहळा
आम्ही पार्लेकर’ मधील श्री. ज्ञानेश चांदेकर यांच्या संपादकीय स्तंभाला पार्लेकर वाचकांनी दिलेल्या पसंतीच्या पावतीमुळेच हे लिखाण येवढी वर्षे सुरु राहीले आहे. त्यातीलच काही निवडक लेखांचे संकलन पुस्तकरुपाने ‘एबीपी माझा’चे मुख्य संपादक राजीव खांडेकर व ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित होत आहे. पुस्तकाला महाराष्ट्र टाईम्स चे माजी संपादक अशोक पानवलकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
स्थळ – गोखले सभागृह, लोकमान्य सेवा संघ ,पहिला मजला, विले पार्ले, मुंबई
दिनांक: रविवार, २२ सप्टेंबर २०२४
वेळ: सायं. ६.०० वाजता
आपली उपस्थिती कार्यक्रमास प्रेरणादायी ठरेल, तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, ही विनंती.