About www.townparle.in in Marathi
विलेपार्ले अथ पासून इति पर्यंत…
आपले पार्ले , प्रवास सुरु झाला एका चिमुरड्या खेड्यापासून , पु. ल. नी ५० वर्षांपूर्वीच्या पार्ल्याचे लिहिलेलं वर्णन वाचून आजही त्या वेळेच्या पार्ल्याचे चित्र डोळ्यासमोर उभ राहत .
५० वर्षांपूर्वीचे ते पार्ले म्हणजे एक चिमुकले गाव होते . संध्याकाळी रेल्वेच्या फलाटावर गाडी थांबली , की उतरलेल्या माणसांची संख्या मोजणे स्टेशन मास्तरना सहज शक्य होई . त्या फलाटाचे ४ फलाट झाले. या काळातल्या पार्ल्याच्या संपूर्ण लोकसंख्ये एवढी माणसे आता त्या फलाटावर सहज मावतील .पावनगडकर यांचा विलेरी चिवडा याहून मोठी चैन करू देणारे पार्ल्यात हॉटेल नव्हते . आणि पार्ल्यात अविवाहितांना नामाजोशांची खाणावळ हा एकमेव आधार होता . गावातल्या सगळ्या दुकानांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येत असे. आणि आज जिथे हौसिंग सोसायट्या उभ्या आहेत तिथून मुंबईच्या बाजाराला टोपल्या भरभरून भाजीपाला जायचा .पार्ल्याच्या माणसाला शिळी भाजी घ्यावी लागत नसे . गाव तीन अंगांनी वेढले होते ; चौथ्या अंगाला थोडासा दूर समुद्र असल्यामुळे रोजच्या ताज्या मासळीची तिथून सोय व्हायची . दुधवाल्या भय्याची रामसारण , वासुदेव भय्या , रामलखन वगैरे नावे माहित होती .दुकानदार देखील गिराहीकांच्या तब्येतीची पाण्याची चौकशी करीत. माणसे मोजकी असल्यामुळे चेहेऱ्यांची ओळख पाळख असे .
हिराण्याकाश्यापू पुढे छाती काढून उभ राहावं तसे गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेले हे त्यावेळेच चीमुरड उपनगर…. पार्ले !
याच पार्ल्याचा चिमुरड्या खेड्यापासून प्रगत , गजबजलेल्या पर्ल्यापर्यन्तचा प्रवास आम्ही टिपण्याचा प्रयत्न केला .हा लेख एडीट करा,जागा अपुरी आहे , किंवा lights, camera ,action अस म्हणत ; चला , लवकर आटपा , वेळ कमी आहे , असा म्हणायला लावणाऱ्या स्थळ आणि काळ याच बंधन असणारी माध्यमे दूर ठेवून कुठेतरी नवीन युगाबरोबर चालत , नवीन युगाच्या नवीन माध्यमांचा अवलंब करून आपल्या माणसांना त्यांच्या गावाच स्पष्ट चित्र कोणत्याही सीमेची तमा न बाळगता दाखवायचं होत. जिथे एखाद्या लेखाला शब्दांचे बंधन नसेल , एखाद्या बातमीला काळाचे बंधन नसेल आणि ज्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायची आहे अशा वाचक वर्गाला स्थळांचे बंधन नसेल !
आणि यातूनच जन्म झाला ; नवीन तंत्रद्यानाने विकसित झालेल्या जुन्या ते नव्या साऱ्या पार्ल्याची इथ्यंभूत माहिती देणाऱ्या
www.townparle.in चा !
खास पार्ल्यासाठी … खास पार्लेकरंसाठी …
एका चिमुरडया खेडयापासून आजच्या प्रगत गजबलेले पार्ल्यापर्यतची सव्वाशे वर्षांची वेचक आणि वेधक वाटचाल उलगडेल फक्त एका click वर आणि पार्ल्याची इत्थंभूत माहिती
कळेल एका दृष्टीक्षेपात !!
बहुरंगी बहुढंगी पार्ल्यावर एक प्रकाशझोत टाकणारी आमची सदरे…..
History – ऎतिहासीक पार्ले एका दृष्टीक्षेपात!
Construction – घर स्वप्नांपासून सत्यापर्यत
Education – विद्येचे माहेरघर पार्ले
Matrimonial — शुभमंगल सावधान
Fashion — फँशन विश्वाची सफर
Finance — सबसे बडा रूपय्या, अर्थकारण पार्ल्याचे
Health — गुरूकिल्ली आरोग्याची
Foods — पुरणपोळीपासून पिझ्झापर्यत
Traveling — रोम अराऊंड पार्ले
यासह तुम्ही जाणून घेऊ शकता पार्ल्याच्या महत्वाच्या घडामोडी www.townparle.in च्या पार्ले वृत्तांतमध्ये
सर्वात महत्वाचे
खास पार्लेकरांसाठी तयार केलेली वेब डिरेक्टरी!
(yellow pages of parle ) आता लग्न असो वा सभारंभ, कँटरर्स हवेत की डेकोरेटर्स नाव पत्ते इथे तिथे शोधत बसायची गरज नाही, वेबसाईटवर लाँग आँन करा Link वर click
करा आणि पूर्ण List घ्या 2 मिनीटांत तुमच्या डोळ्यासमोर! प्रत्येक section मध्ये तुमच्यासाठी ही सोय आम्ही केलेली आहे. मग वाट कसली बघताय, Log on to