जनसेवा समिती ,विलेपारले आयोजित ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा :
ग्यानोबा माऊली तुकाराम..!
रामकृष्ण हरी..रामकृष्ण हरी!
मंडळी,
जनसेवा समितीच्या वतीने आषाढी एकादशीच्या सायंकाळी विलेपारले उपनगरात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रतिकात्मक दिंडीच्या माध्यमातून 1990 सालापासून गेली 33 वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येत आहे.
वारकरी पथकासमावेत आपले कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार आणि सामान्य नागरिक त्यात सहभागी होऊन हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगच्या ठेक्यावर ताल धरत, माऊलींची पालखी दिंडी स्वरूपात नेतात.
या वर्षीही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात, आषाढी एकादशीला म्हणजेच गुरूवार दि 29 जून 2023 रोजी सायं ठीक 6.30 या या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
वारकरी पथकासमवेत ही दिंडी खालील मार्गाने साधारण रात्रौ 8.30 पर्यंत समाप्त होईल.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – गुरूवार, दि 29 जून 2023
दिंडी प्रस्थान- सायं ठीक 6.30 वा हनुमान मंदिर, कंकुवाडी, फिरोजशहा मेहता मार्ग, विलेपारले पूर्व
दिंडी मार्ग – हनुमान मंदिर – नेहरू रोड – म.गांधी मार्ग – पार्लेश्वर मंदिर – पार्ले टिळक विद्यालय – वर्मा टेलर्स – तेजपाल स्कीम मार्ग क्र 3 – विठ्ठल मंदिर
दिंडी समाप्ती – साधारण रात्रौ 8.30 वा विठ्ठल मंदिर, तेजपाल स्कीम मार्ग क्र 3 येथे समाप्त होईल.
आपणा सर्वांना विनंती आहे की आपण, आपले कुटुंबीय, मित्रपरिवार यांनी मोठ्या प्रमाणात या भक्ती- सोहळ्यात सामील व्हावे.
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा –
9820468680 / 9987565738
पोस्टर क्रेडिट – बेला बर्वे

