खास ख्रिसमस साठी केक्स
ख्रिसमस हा सर्वांचाच आवडता सण. वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या केकचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण यावेळी उत्सुक असतात. मात्र ख्रिसमस स्पेशल केक नेमका बनवायचा कसा हे बरेचदा माहित नसते म्हणूनच , या लेखात आपल्यासाठी देत आहोत ख्रिसमस मध्ये बनवल्या जाणाऱ्या काही खास केक्स च्या रेसिपीज …
चॉकलेट ब्राउनी केक
साहित्य : 80 ग्रॅम मैदा, 130 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 80 मिली दूध, 60 ग्रॅम बटर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा ,व्हेनिला इसेंस, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा कोको पावडर, 2 चमचा ब्राउन शुगर, 2 चमचा काळा रंग, 2 चमचा ,चॉको चिप्स, 30 ग्रॅम चॉकलेट.
कृती : सर्वप्रथम क्रीम, बटर आणि कस्टर्ड मिल्क चांगल्याप्रकारे फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा आणि इसेंस घालून परत एकदा फेटावे. नंतर त्यात दूध घालून मिश्रण एकजीव करावे. केकपात्राला तुपाचा हात लावून मैदा टाकावा आणि त्यावर हे मिश्रण ओतावे. 180 डिग्री सें. वर 25 मिनिटापर्यंत केक बेक करावी. थंड झाल्यावर चॉकलेट सॉस आणि चॉको चिप्सने सजवून सर्व्ह करावी.
बनाना केक

साहित्य : 2 केळी, 1 कप मैदा, दीड चमचा बेकिंग पावडर, चिमूट मीठ, 1/2 कप चेरी, 3/4 कप साखर, 1/2 कप बटर, दोन अंडी.
कृती : सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर व मीठ चाळून घाला. त्यात साखर, बटर, अंडी, व केळ्यांचा लगदा करून त्यात मिक्स करावा. सर्व घालून मिश्रणाला एकाच दिशेने फेटून घ्या. केक टिनला बटरपेपर लावा. मिश्रण घालून मध्यम ओव्हनमध्ये बेक करा. केक हाताला स्पंजाप्रमाणे लागला व कडेनं सुटू लागला की झाला म्हणून समजावे, सर्व्ह करताना चेरी सजवून सर्व्ह करावा.
रम केक

साहित्य : काजू 100 ग्रॅम, 50 ग्रॅम मनुका, 100 ग्रॅम गुलाब कतरी, 50 ग्रॅम ऑरेंज पील, 50 ग्रॅम चिरोंजी, 50 ग्रॅम ,खजूर, 50 ग्रॅम स्वीट जिंजर, 50 ग्रॅम काळ्या मनुका, 1/4 कप रम.
केकसाठी साहित्य : 250 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम मैदा आणि 6 अंडी.
कृती : सर्वप्रथम केक तयार करण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व प्रकारच्या मेव्यांना बारीक कापून आवश्यकतेनुसार रममध्ये भिजत घालावे. एक मोठ्या भांड्यात अंडी फोडून त्यांना चांगल्याप्रकारे फेटून घ्या. आता त्यात साखर व मैदा घालून मिश्रणाला एकजीव करावे. नंतर त्यात रममध्ये भिजलेले सुके मेवा व 1/4 कप रम मिसळावी. मिश्रणाला परत एकजीव करावे. तयार मिश्रणाला तूप लावलेल्या केक पॉटमध्ये ओतावे. पॉटला गरम ओव्हनमध्ये 160 डिग्रीवर ठेवावे. 40-45 मिनिटापर्यंत केक बेक करावा व थंड झाल्यावर सावधगिरीने काढून घ्यावी. स्वादिष्ट रम केक तयार.
प्लम केक

प्लम केक शिवास ख्रिसमस अपूर्णच .
प्लम केक साठी साहित्य :
१ कप मैदा १ कप ड्राय प्लम चे स्लाइस अर्धा कप काळ्या व पिवळ्या मनुका , बदाम, काजू, अक्रोड इ ३ अंडी (फेटलेली)अर्धा कप बटर अर्धा कप साखर १ टी स्पून लिंबाची क्रश केलेली साल १ चिमूट बेकिंग पावडर
कृती :ओव्हन ला ३२५ डिग्रीवर प्री हिट करा. एका बाउल मध्ये साखर व बटर एकत्र फेटून घ्या. दुसऱ्या बाउल मध्ये अंड्याचा बलक आणि क्रश केलेली लिंबाची साल फेटून घ्या. मग त्याला साखर व बटरच्या मिश्रणात एकत्र करून घ्या आणि त्यात ड्राय फ्रुट्स वगरे टाकून फेटून घ्या. नंतर बटर लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण आणि प्लम चे काप मिक्स करून ४५ मिनिटांपर्यंत बेक करा. थंड झाल्यावर स्लाइस कापून सर्व करा
Pc:google

