चालणे उत्तम, सोपा अन् बिनखर्चाचा व्यायाम.

आपला सध्याचा आयुष्य इतकं धावपळीचं झालंय की अनेकदा इच्छा असूनही आपल्याला व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.इतर कामांचा थकवा इतका असतो की शेवटी व्यायाम करायला त्राणही शरीरात उरत नाही.हल्ली घरे ही इतकी लहान असतात की पूर्वी प्रमाणे अंगणात, घराच्या एखाद्या खोलीत व्यायाम करायचा म्हटला तरी जागा कुठे हो ? उघडी मैदाने तर स्वप्नातलीच गोष्ट झाली आणि फॅन्सी व्यायामशाळा,जिम यांची मेंबरशिप तर बरेचदा आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट होते.अशी एक ना अनेक कारणे आहेत व्यायाम न करण्याची. पण ज्यांना खरोखरच आपले शरीर तंदुरुस्त ठेवायचे आहे त्यांच्यासाठी अगदी सहज सोपा आणि बिनखर्चाचा व्यायाम प्रकार उपलब्ध आहे तो म्हणजे चालणे.
चालणे हा व्यायाम प्रकार म्हणून पाहताना चाल कशी आहे यावर बरेच काही अवलंबून असते.शक्य तेवढ्या झप झप चालणे हे अधिक फायदेशी असते.पाऊल टाकताना शरीराचा भार प्रथम टाचेवर देऊन मग चवड्यावर टाकण्याने स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. शिवाय टाच ते चवडा असे पाऊल टाकताना किंचित आत वळवणे श्रेयस्कर ठरेल.
चालताना ताठ मानेने झाला ,छाती बाहेर काढून पोट जमेल तेवढ्या आत घ्या.चालताना पृष्ठभाग जेवढा जास्त आवळून धराल तेवढा चांगला व्यायाम होतो.
आठवड्यातून किमान ५ दिवस आणि प्रत्येक दिवशी साधारण ४५ मिनिटे चालल्याने उत्तम व्यायामही होतो आणि चरबी जाळण्यासाठी त्याने मदत होते पर्यायाने तुम्ही वजन कमी करायचे ठरवले असेल तर तुमचे लक्ष्य गाठणे अधिक सोपे होते.चालण्यामुळे मेंदूलाही तरतरी येते.
रोजच्या आयुष्यात चालण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची कधी कधी गरजही नसते अगदी साध्या उपायांमधून तुम्ही हे साधू शकता. म्हणजे तुम्ही ऑफिसला जर बसने जात असाल तर एक किंवा दोन स्टॉप आधी उतरून चालत जा.
संध्याकाळी बाजारात जाताना स्कूटर किंवा रिक्षा न करता चालत जाऊन या.
तुमच्या घराला गच्ची असेल तर सकाळी सूर्योदयानंतर साधारण अर्धा ते पाऊण तास गच्चीवर चाला म्हणजे तुमची चालही होईल आणि सूर्योदयानंतर अर्धा तास वातावरणात उपलब्ध असणारे डी व्हिटामिनही तुमची त्वचा शोषून घेईल.म्हणजे पुढे हाडांचा त्रासही वाचेल.
चालण्या बरोबरच काही योगासने शिकता आली आणि तुम्ही त्यांचाही वापर करायला लागलात तर तुमचे शरीर अधिक लवचिक होईल आणि तब्येत उत्तमच होईल.मग कधीपासून सुरू करताय चालायला ??

pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu