“देणे समाजाचे “- एक सद्भावना महोत्सव – ११,१२ फेब्रुवारी २०२३

पुण्यातील दिलीप गोखले आणि वीणा गोखले यांच्या प्रयत्नातून सुरु झालेला आणि गेली अठरा वर्ष चालू असलेला ‘देणे समाजाचे’ हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे.

“आर्टिस्ट्री” प्रस्तुत “देणे समाजाचे ” हे एक अनोखे व्यासपीठ आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला करून देणे , त्यांना आर्थिक तसेच इतर मदत मिळवून देणे आणि त्याच बरोबरीने समाजालाही त्यांचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून देणे , असा ह्या उपक्रमाच्या मागचा उद्देश आहे. २००५ ते २०२२ ह्या कालावधीत जवळपास २५० सामाजिक संस्था ह्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि अंदाजे दहा कोटीपेक्षा जास्त निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना मिळवून दिली. सहभागी संस्थांकडून कोणतीही शुल्क आकारणी न करता हा भव्य उपक्रम गेली १८ वर्षे पुण्यामध्ये व्रतस्थपणे राबवला जातो.

वेगवेळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या, प्रामुख्याने ग्रामीण, निमशहरी भागातल्या २८ ते ३० सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले जाते . या सर्व संस्था निवडताना अतिशय काटेकोरपणे निवडल्या जातात जेणेकरून योग्य अशा संस्थाना मदत मिळेल.

काय होतं की अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे हा प्रश्न पडतो. ह्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळेल. स्त्रिया आणि लहान मुलांचे प्रश्न, अनाथ मुले, वृद्ध, ग्रामीण विकास, विशेष मुले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न, अंध, अपंग, दुष्काळग्रस्त भागाचे प्रश्न, धान्य बॅंक अश्या विविध विषयांवर काम करणाऱ्या संस्था असतात. या संस्थांचे काम खरच कौतुकास्पद असते. प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी त्यांच्या स्टॉलवर माहिती देतात. समाजात उत्तम काम करणाऱ्या अनेक लोकांशी एकाच वेळी संवाद साधण्याची ही एक उत्तम संधी असते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. डोनेशन द्यायलाच हवे अशी सक्ती / सुचना नाही. आपण आर्थिक किंवा इतर स्वरूपातील मदत करू शकता ( सेवा, वस्तू, कपडे, विशेष कौशल्य वगैरे)

देणगीदार आणि सामाजिक संस्था , यामध्ये एक विश्वासार्ह दुवा ठरलेल्या “देणे समाजाचे ” हा उपक्रम २०१९ पासून मुंबई मध्येही आयोजित केला जातो. २०२३ मधेसुद्धा हा उपक्रम मुंबईत ११,१२ फेब्रुवारी महिन्यात विलेपार्ले येथे सावरकर केंद्रामध्ये होणार आहे.

पुणेकरांना हा उपक्रम नवीन नाही आणि वर्षातून एकदा होणाऱ्या या प्रदर्शनाची ते वाट पहात असतात. पण मुंबईकरांसाठी हा उपक्रम नवीन आहे म्हणून अतिशय निस्पृहपणे चालणारा हा उपक्रम मुंबईतील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी विशेष प्रयत्न करायला लागणार आहे. जाहिरात हा मार्ग निवडण्याऐवजी लोकसहभागातून हे साध्य झाले तर अधिक परिणामकारक होइल असे वाटते.

आपल्यासारख्या समाजभान जपणाऱ्या सुहृदांनी हा उपक्रम मुंबईत यशस्वी होण्यासाठी हातभार लावावा अशी विनंती आहे.

धन्यवाद

वीणा गोखले
98220 64129Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu