घटस्थापना

शारदीय नवरात्रात सुख, शांतता आणि समृद्धीसाठी घटस्थापना केली जाते.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवसाचे नवरात्र म्हणतात . प्रतिपदेस घटस्थापना करतात.  तब्याचा तांब्या घेऊन त्यात पाणी घ्यावे व त्यात पैसा सुपारी फुल दुर्वा टाकावे. त्यावर ताम्हण ठेऊन त्यात थोडे तांदूळ घालून देवीची रीतसर पूजा करून अभिषेक करून  त्यावर देवीची मूर्ती अथवा तसबीर ठेवावी .त्याच्या बाजूला टोपलीमध्ये काळीमाती घालून सप्तधान्य पेरावे. सप्त धान्य आधी हळदीच्या पाण्याने धुवून घ्यावे. नवमीपर्यंत सप्तशतीचा पाठ वाचतात .अहोरात्र देवाजवळ दिवे नंदादीप लावतात फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे अगर काही ठिकाणी रोज एक एक वाढवीत जाऊन शेवटच्या दिवशी नऊ माळा घालतात ब्राह्मण व सुवासिनी यांना जेवायला बोलावतात  नऊ दिवस रात्री निरनिराळे खेळ खेळतात, ललिता पंचमी या दिवशी ललिता देवीची पूजा करतात, या दिवशी मंत्रजागर करून दूध व काकड्या खाण्याचा परिपाठ आहे. अश्विन शुद्ध अष्टमी या दिवशी महालक्ष्मीची पूजा करण्याची चाल आहे. विवाहानंतर पाच वर्षे प्रत्येक सुवासिनी ही पूजा करते. पहिल्या वर्षी एक खडा, दुसऱ्या वर्षी दोन, असे जितकी वर्ष झाली असतील तितकी खडे  घेऊन त्यात सोळा कड्यांचा दुर्वांचा तातू घालतात. नंतर रेशमाचा, सोळा विती तातू घेऊन त्याला जितकी वर्षे झाली असतील तेवढ्या गाठी मारतात आणि खडे, दुर्वांचा तातू आणि गाठी मारलेला रेशमाचा तातू या सर्वांची षोडशोपचारे पूजा करतात. ज्या सुवासिनी पूजा करतात त्यांनी आपल्या घरातून शिधा आणायची चाल आहे . नंतर सर्व सुवासिनी मिळून एकत्र भोजन करतात. संध्याकाळी महालक्ष्मीचा तांदळाच्या पिठाचा मुखवटा व मूर्ती तयार करतात त्याच्या आत सकाळी पूजा केलेले खडे व तातू असतात. रात्री गाणी म्हणून आणि नृत्य वगैरे मनोरंजन करून सर्व रात्र महालक्ष्मी जागवतात. महालक्ष्मीच्या मुखवटे यातच वाहून टाकतात. महालक्ष्मी पुढे घागरी फुंकत असतात. एखाद्या सुवासिनीच्या अंगात देवी संचार करते. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीचे विसर्जन करतात.

नऊ दिवसात कधीही कुंकुमार्चन केले तरी चालते.

कुंकुमार्चन : कुलदेवीची आराधना करण्याचा हा एक उत्तम मार्ग-कुंकुमार्चन

त्या संबधी कोणती काळजी घ्यावी ?

कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट ) पात्रात घेऊन सुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवल अंगठा तर्जनी व मधीले बोट यानीच कुंकु घेऊन देवीच्या चरणा पासून मस्तका पर्यंत वाहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे.

कुलदेवीची आराधना करण्याचा हा  एक उत्तम मार्ग आहे.कुंकुमार्चन करताना अनेक कामना बाळगल्या जातात उदा. शीघ्र विवाह,उत्तम वर किंवा वधूप्राप्ती ,मनःशांती, ऋणमोचन,शापमोचन ,सौभाग्यवर्धन, धनप्राप्ति,विद्यप्राप्ती ई . विशेष करून अष्टमी ,चतुर्दशी,पौर्णिमा ,नवरात्र ,लक्ष्मीपूजन ,मंगळवार ,शुक्रवार या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे,अमावस्येला कुंकुमार्चन करु नये.आश्विन नवरात्रात सप्तशती चे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे . नामावलीने देवतेवर वा देवताप्रतिकावर विशिष्ट उपचार द्रव्य  अर्पण करणे ह्यास अर्चनक्रिया म्हणतात . ही शीघ्र फलदायी उपासना आहे ह्या अर्चनक्रियेत त्या त्या देवतेला प्रिय असणारे द्रव्य घेतात.सर्व देवतांना फुलांनी कुसुमार्चन, अक्षतांनी अक्षतार्चन करता येते.तसेच श्री कृष्णाला तुलसी अर्चन, महादेवास् बिल्वअर्चन ,गणेशास दुर्वार्चन, देवीस कुंकुमार्चन विशेष प्रिय आहे .देवीची मूर्ती ,प्रतिमा , टाक, श्रीयंत्र, सप्तशती महायंत्र,देवीच्या पादुका ह्यापैकी एकावर   श्री सूक्त ,देवि स्तुती, नवार्ण मन्त्र,देवी  सहस्त्र नामावली,देवी अष्टओतर शत नामावलीने कुंकू वाहाणे यास कुंकुमार्चन म्हणतात ,कुंकुमार्चन हे मंदिरात अथवा घरी देखील करू शकतात जर देवी चे कोणतेही प्रतीक उपलब्ध नसेल तर  दर्पण म्हणजे आरसा घेऊन त्याबर देखील कुंकुमार्चन करू शकतात मात्र त्यावेळी नवीन आरासा घ्यावा त्यामध्ये स्वतः चे प्रतिबिंब बघू नये, नित्य कुंकुमार्चन करावयाचे असल्यास तो आरसा देवघरात ठेवावा विशिष्ट कामनेसाठी आरशा वर कुंकुमार्चन केले असेल तर कामनापूर्ती झाल्यानन्तर तो आरसा सुहासिनी ला दान द्यावा  किंवा घरात वापरण्यास घ्यावा.निष्काम हेतूने  अर्चना  केली असल्यास अर्पण केलेले कुंकू घरातील व बाहेरील व्यक्ती ना प्रसाद म्हणून देण्यास हरकत नाही प्रसाद वाटून देखील कुंकू उरले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडावे  विसर्जन करावे .  कुंकुमार्चन करताना कुंकूवाला जाळी लागलेली असू नये कुंकुमार्चन नन्तर ते कुंकू रोज स्वतः चा कपाळी लावावे..

कुंकुमार्चन करताना श्रीसुक्तम् अवश्य म्हणावे

श्रीसुक्तम् – 

ॐ हिरण्यवर्णां हरिणींसुवर्णरजतस्रजाम्*

हरिः ॐ

हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।

चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।

यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥२॥

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ।

श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥३॥

कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।

पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥४॥

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।

तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥५॥

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः ।

तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥६॥

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।

प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥७॥

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।

अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥८॥

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।

ईश्वरींग् सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥९॥

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।

पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥

कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम ।

श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥११॥

आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।

नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥१२॥

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।

चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१३॥

आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।

सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१४॥

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।

यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पूरुषानहम् ॥१५॥

यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् ।

सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ॥१६॥

फलश्रुती

पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मासम्भवे ।

त्वं मां भजस्व पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ॥१७॥

अश्वदायि गोदायि धनदायि महाधने ।

धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे ॥१८॥

पुत्रपौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवे रथम् ।

प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु माम् ॥१९॥

धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः ।

धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्नुते ॥२०॥

वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा ।

सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ॥२१॥

न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभा मतिः ।

भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्सदा ॥२२॥

वर्षन्तु ते विभावरि दिवो अभ्रस्य विद्युतः ।

रोहन्तु सर्वबीजान्यव ब्रह्म द्विषो जहि ॥२३॥

पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षि ।

विश्वप्रिये विष्णु मनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ॥२४॥

या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी ।

गम्भीरा वर्तनाभिः स्तनभर नमिता शुभ्र वस्त्रोत्तरीया ॥२५॥

लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिगणखचितैस्स्नापिता हेमकुम्भैः ।

नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता ॥२६॥

लक्ष्मीं क्षीरसमुद्र राजतनयां श्रीरङ्गधामेश्वरीम् ।

दासीभूतसमस्त देव वनितां लोकैक दीपांकुराम् ॥२७॥

श्रीमन्मन्दकटाक्षलब्ध विभव ब्रह्मेन्द्रगङ्गाधराम् ।

त्वां त्रैलोक्य कुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियाम् ॥२८॥

सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मीस्सरस्वती ।

श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा ॥२९॥

वरांकुशौ पाशमभीतिमुद्रां करैर्वहन्तीं कमलासनस्थाम् ।

बालार्क कोटि प्रतिभां त्रिणेत्रां भजेहमाद्यां जगदीस्वरीं त्वाम् ॥३०॥

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।

शरण्ये त्र्यम्बके देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥

नारायणि नमोऽस्तु ते ॥ नारायणि नमोऽस्तु ते ॥३१॥

सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुक गन्धमाल्यशोभे ।

भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥३२॥

विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् ।

विष्णोः प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॥३३॥

महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ।

तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥३४॥

श्रीवर्चस्यमायुष्यमारोग्यमाविधात् पवमानं महियते ।

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥३५॥

ऋणरोगादिदारिद्र्यपापक्षुदपमृत्यवः ।

भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा ॥३६॥

य एवं वेद ।

ॐ महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ।

तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥३७॥

महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी असून भक्तावरील सर्व प्रकारची संकटे दूर करून संकटांचा सर्वनाश करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे. हे स्तोत्र अनन्य भावाने म्हटले असता आई जगदंबा प्रसन्न झाल्यावाचून राहणार नाही.

॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥

श्री गणेशाय नमः

नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते । 

शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते॥१॥

नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।

सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी । 

सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥

सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।

मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी । 

योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे । 

महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।

परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते । 

जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते॥८॥

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः । 

सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा॥ ९ ॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।

द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ll१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।

महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णll

सौ. मानसी मंगेश सावर्डेकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu