शेयर बाजारातील ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये अभिमन्यू राहायचे कि अर्जुन व्हायचे..

महाभारतात २ पात्रे अशी  होती कि दोघेही खपू धाडसी आणि पराक्रमी. ते म्हणजे अभिमन्यू आणि अर्जून. अभिमन्यू ने आपण मिळविलेल्या तुटपुंज्या ज्ञानातून मोठा पराक्रम गाजविण्याचा प्रयत्न केला,  तर अर्जुनाने उत्कृष्ट आणि शास्त्रशुद्ध युद्धकला आत्मसात केली आणि त्याचबरोबर आत्मविश्वास बळावण्यासाठी श्री कृष्णासारख्या गुरुलाही सोबत घेतले. अभिमन्यूचा पराक्रम तोकडा पडला , मात्र अर्जुनाने आपल्या पराक्रमाने  रणभूमी गाजविली . शेयर बाजारातील ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करताना नक्कीच आपल्याला अर्जुनासारखे यशस्वी व्हायला आवडेल.

वर्ष २०२० पूर्वी शेयर बाजारात ट्रेडर्स ची संख्या खूप कमी होती, मार्च २०२० नंतर लॉक डाऊन नंतर ट्रेडर्स ची संख्या झपाट्याने वाढू लागली. डिसेम्बर २०२२ अखेरीस ह्या नव्या ट्रेडर्स चा आकडा अगदी २.५ करोडच्या पुढे गेला. त्यातील किती जण सध्या सक्रिय आहेत हा भाग वेगळा. ह्या बहुतेक सर्व ट्रेडर्स ने शेयर बाजारातला आपला प्रवास जास्त जोखीम असलेल्या स्टॉक ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग ने चालू केला. कमीत कमी गुंतवणूक करून  जास्तीत जास्त नफा कसा कामविता येईल ह्या कडेच साऱ्यांचे लक्ष. कोणताही अभ्यास न करता किंवा तुटपुंज्या माहितीवर आणि कोणतेहि ठोस धोरण न आखता ट्रेडिंग करणारे कायम भ्रमात असतात कि ते चांगला नफा कमावत आहेत . बऱ्याच वेळा असं होतं कि ४-५ ट्रेड मध्ये नफा होतो आणि त्यानंतर एका ट्रेड मध्ये झालेला तोटा सगळा  नफा खाऊन टाकतो. 

SEBI ने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, SEBI म्हणते की स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करणाऱ्या 10 पैकी फक्त 1 ट्रेडर फायदेशीर आहे आणि जे नफा कमावतात त्यांचा वर्षाचा सरासरी नफा फक्त १.५ लाख आहे हि काही आनंदाची बाब नाही.

हा अहवाल हे हि दर्शवितो कि अव्वल १% ट्रेडर पूर्ण नफ्याच्या ५१% नफा घेऊन जातात. आता प्रत्येक ट्रेडर स्वप्न पाहिल कि तो ह्या १% अव्वल ट्रेडर मध्ये कसा सामील होईल. पाहूया कोणत्या गोष्टी ह्यासाठी त्याला मदत करू शकतात. 

हे अगदी सोपे उत्तर आहे, शेयर बाजारात जास्त वेळ घालवा. सगळ्यात महत्वाचे , ट्रेडिंग सातत्याने करा आणि नियमित पणे तुमच्या चुकांचे पुनरावलोकन करा. तुम्ही 6 महिन्यांत किंवा वर्षभरात तज्ञ ट्रेडर होऊ शकता हे डोक्यातून काढून टाका. डॉक्टरांना 5 वर्षे आणि इंजिनियर्सना 4 वर्षे लागतात स्वत:ला एक पात्र व्यक्ती म्हणवून घेण्यासाठी. मग यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला नक्कीच बाजारात जास्त कालावधी व्यतीत करावा लागेल.

हे आपल्याला वाटते तितके साधे सोपे नाही. ट्रेडिंग करताना आपल्या डोक्यात जे विचार येतात तेच तुमच्या ट्रेडिंग करिअरची दिशा ठरवते. समाजाचा ट्रेडिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन हा कायम जुगारी किंवा सट्टेबाज असाच राहत आलेला आहे. आणि बऱ्याचवेळा समाजाच्या ह्या अशा दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्या ट्रेडिंग वर पडतो. अशा वेळी कायम आपल्या डोक्यात “चुका करणे वाईट आहे किंवा चुकीचे निर्णय वाईट आहेत” ह्याचा पगडा जास्त असतो आणि ट्रेडिंग करण्यासाठी जी शिस्त किंवा नियम अत्यावश्यक असतात तिकडे दुर्लक्ष होऊ शकते.

  • ट्रेडिंग करताना कधी स्वतःला निराश होऊ देऊ नका.

“मी ट्रेडिंग मध्ये खूप प्रयत्न केले आहेत आणि मला वाटत राहते की मी बरोबर आहे. परंतु जर मी चुका करतोय, तर हे सूचित करते की मी विचार केला होता तितका मी यशस्वी ट्रेडर नाही .”   हा विचार तुम्ही किती वेळा केला आहे? असा विचार जर वरचेवर येत असेल तर तुम्ही निराशावादी बनून जाल आणि यशस्वी ट्रेडर बनण्यास मोठा अडथळा बनेल.  ट्रेडिंग मध्ये झालेल्या नुकसानाचा असा विचार करा कि “तोटा ही फक्त एक घटना आहे जी त्या क्षणी घडण्याची 50% शक्यता होती, दुसरे काही नाही” ट्रेडचे थोडक्‍यात विश्लेषण करून त्यावर अतिविचार करण्यापेक्षा पुढे जाणे चांगले.

  • ट्रेडिंग आणि ड्रायव्हिंग यातील साधर्म्य याचा अभ्यास करा.

गाडी चालवताना तुम्ही कोणत्याही प्रकारे भावनिक न होता सुरक्षित पणे गाडी चालविण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करता. शांत पणे तुम्ही टप्प्या टप्प्याने आपल्या गंतव्यस्थानाकडे मार्गक्रमण करीत असता. सुरक्षित पणे गाडी चालविण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून आपण उत्तेजित होऊन गाडी चालविल्यास नक्कीच मोठा अपघाताची शक्यता असते. मात्र आपण गाडी चालविण्याची प्रक्रिया अनुसरण करीत असताना, कधी छोट्या चुका झाल्या, जसा बाजूने जाणारी एखादी गाडी आपल्याला घासून गेली किंवा गाडी पार्किंग मध्ये असताना गाडी वर ओरखडा आला . अशा वेळी ह्या छोट्या चुकांबद्दल आपण जास्त काळ दुःख करीत बसत नाही , उलट ह्या चुका येणाऱ्या काळात पुन्हा कशा घडणार नाहीत ह्याचे अवलोकन आपण करतो. तसेच ट्रेडिंग करताना आपण कोणत्याही प्रकारे भावनिक किंवा उत्तेजित न होता योग्य ट्रेडिंग ची योग्य प्रक्रिया अवलंबिली तर आपल्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही. ज्या छोट्या छोट्या चुका होतील त्याची पुनरावृत्ती कशी टाळता येईल याचा अभ्यास करणे सोपे जाईल. 

  • शेयर बाजारात आपण निराशाजनक कधी असतो?

# आपण एखादा ट्रेड घेत नाही, नेमका त्यात नफा होण्याचे प्रमाण अधिक असते, आपण निराशाजनक होतो.

# आपण नेमका असा ट्रेड घेतो कि त्यात आपल्याला तोटा सहन करावा लागतो, आपण निराशाजनक होतो.

# आपण एखादा ट्रेड घेतो, तो बरोबर हि असतो पण तुम्ही नफा काढून घेतल्यावर कळते कि थोडा अधिक काळ ट्रेड धरून ठेवला असता तर खूप जास्त नफा होऊ शकला असता, तुम्ही अशावेळी हि निराशाजनक होता.

आपण निराशावादाला दूर ठेवू शकता का?

हे कठीण आहे , अस्थिर चंचल शेयर बाजार आणि त्यामुळे आपल्याला असणारी चिंता किंवा काळजी आपल्याला निराशावादी बनवणे स्वाभाविक आहे. मात्र आपण निराशावादीच राहिलो तर आपण ट्रेडर बनण्यास पात्र नाही. यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने आशावादी राहणे अत्यावश्यक आहे .  ट्रेडिंग करताना आपण स्वतःला काही नियम आणि शिस्त आखून दिले पाहिजेत. जो पर्यंत निराशावाद आपल्या डोक्यातून जात नाही आणि आपल्याला ट्रेडिंग बद्दल आत्मविश्वास बळावत नाही तो पर्यंत आपण PAPER TRADING म्हणजेच प्रत्यक्ष पैसे न गुंतविता कागदावर त्याचा अभ्यास करावा. शेयर बाजारातील चढउतार दर्शविणारे निरनिराळे इंडिकेटर्स आणि इतर पॅरामीटर्स पूर्णपणे आपल्याला समझत नाहीत तो पर्यंत पेपर ट्रेडिंग चालू ठेवावे. फ्युचर्स अँड ऑपशन्स मध्ये  ट्रेडिंग करताना आंधळे पणाने एकतर्फी ट्रेड न करता, आपले ट्रेड व्यवस्थित संरक्षित (HEDGE ) केल्यास , आपला ट्रेड चुकीचा जरी गेला तरी होणारे नुकसान मर्यादित ठेवता येते. लेखात वर उल्लेखिलेल्या गाडी च्या उदाहरण प्रमाणे. ट्रेडिंग मध्ये आपण एक योग्य प्रक्रिया  ( PROCESS DRIVEN TRADING )  अवलंबिली , कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन च्या संयुक्त धोरणातून (TIME TESTED STRATEGIES ) आपल्याला ठरतील अशा सोयीस्कर धोरणाप्रमाणे नियमित ट्रेडिंग करीत राहिलो आणि आपण केलेल्या ट्रेड पैकी फक्त ६० ते ७० % ट्रेड जरी नफा देणारे असले तरी वर्षाच्या अखेरीस आपण चांगला नफा कमावू शकतो.     

स्वतःवर जास्त दबाव आणू नका. बाजारातील प्रतिकूल परिस्थितीकडे शांतपणे आणि मन मोकळेपणाने पाहू शकाल आणि आपण घेतलेल्या ट्रेड मध्ये बाजाराच्या अस्थिरते प्रमाणे आवश्यक बदल करू शकाल तेंव्हा तुम्ही चांगले यशस्वी ट्रेडर बनाल .तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आशावादी विचारशैली जोपासणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर शेयर बाजारातील तांत्रिक विश्लेषणाचा नियमित अभ्यास करीत राहावा लागेल.

निराशावादापासून दूर राहा, आत्मविश्वास बाळगा , नियमित अभ्यास करा आणि ट्रेडिंग मध्ये , ट्रेडिंग मध्ये होत असलेल्या चुकांमधून शिका. कमी कालावधीत झटपट यशस्वी होण्याचे डोक्यातून काढून ताक, संयम ठेवा आणि बाजारात जास्त वेळ घालावा. अशी नियमावली बनवलीत तर तुम्ही नक्की यशस्वी ट्रेडर व्हाल.

धन्यवाद.

©निलेश तावडे

9324543832  / nilesh0630@gmail.com

लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्ष कार्यरत होते, सध्या ते म्युच्युअल फंड वितरक वितरक आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu