पार्ले टिळक विद्यालयाची शतकसंवत्सरी वर्षात वाटचाल..

पार्ले टिळक विद्यालयाचे सर्व आजी-माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतक या सर्वांना माहीतच आहे की 9 जून 2020ला आपली शाळा, आणि त्याचबरोबर पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन (PTVA) ही आपली संस्था, शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे.

शाळेच्या सुरुवातीपासून दर वर्षी ९ जून रोजी PTVAच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य आणि PTVA संचालित करत असलेल्या शैक्षणिक संस्थांचे प्रमुख लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतात. त्यात शतसंवत्सरी वर्षात पदार्पण हा तर शाळेसाठी आणि PTVAसाठीही विशेष महत्त्वाचा टप्पा! तरीही
सद्य:स्थितीत कुठलाही समारंभ करून हा दिवस साजरा करण्याचा विचारदेखील आपण कोणीही करणार नाही. त्यामुळे PTVAच्या व्यवस्थापक मंडळाने या वर्षी सध्याच्या अपवादात्मक परिस्थितीला साजेल अशाच पध्दतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत साधेपणाने या शतसंवत्सरी वर्षाला सुरुवात करायची ठरवले आहे.

पण या दिवसाचे विशेष महत्त्व लक्षात घेता शाळेच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना, आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, हितचिंतक आणि शाळेशी/संस्थेशी संबंधित सर्वांनादेखील ९ जूनच्या या छोटेखानी समारंभात सहभागी व्हायला नक्की आवडेल याची जाणीव असल्याने हा कार्यक्रम संस्थेच्या Facebook Live तसेच YouTube Live या चॅनेल्सवर दाखविण्याचे ठरले आहे. आपणा सर्वांची virtual उपस्थिती नक्कीच PTVAच्या व्यवस्थापक मंडळाच्या सर्व सदस्यांना तसेच सर्व संबंधितांना प्रोत्साहन देईल.

सदर कार्यक्रमाद्वारे PTVAचे व्यवस्थापक मंडळ आपल्या सर्वांशी संवाद साधेल. तसेच या वर्षात सदर Live Channelsचा तसेच संस्थेच्या www.parletilakvidyalayaassociation.com या संकेतस्थळाचा वेळोवेळी वापर करून शाळा व PTVAसंचालित इतर सर्व शैक्षणिक संस्था यांच्या पुढील वाटचालीसाठी PTVAने योजलेल्या अनेक प्रकल्पांची आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाईल.

त्यामुळे आपण सर्वांनी PTVA चे हे live चॅनेल्स जरूर subscribe करावेत आणि आपापल्या मित्र-मैत्रीणींनाही हे चॅनेल्स subscribe करायला सांगावे असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाची वेळ येत्या काही दिवसात संस्थेच्या www.parletilakvidyalayaassociation.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल आणि तसेच WhatsAppच्या माध्यमातून जास्तीत जास्त आजी-माजी  विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व हितचिंतकांना कळविण्याचा प्रयत्न केला जाईल.

संस्थेच्या YouTube तसेच Facebook वरील Live Channelsना subscribe करण्यासाठी खालील लिंक्सवर click करा.

https://www.youtube.com/channel/UCm84G7K_lQrLDJexiQt8QLQ

https://m.facebook.com/ParleTilakVidyalayaAssociation/?ref=bookmarks 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu