वाचकांना पर्वणी, साठ्ये कॉलेजमध्ये ‘पुस्तक महोत्सव’
मुंबई, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या बीएमएम विभागातर्फे माध्यम महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही माध्यम महोत्सव एका नव्या संकल्पनेवर आधारीत असेल.यंदा माध्यम महोत्सवाअंतर्गत ‘पुस्तक महोत्सव’ भरवण्यात येणार आहे. पुस्तक महोत्सव 15, 16 आणि 17 डिसेंबर 2016 रोजी आयोजीत करण्यात आला आहे.
‘चित्रशताब्दी’, ‘माध्यमांची जत्रा’, ‘बायोस्कोप’, ‘माध्यमगड’ अशा संकल्पना घेऊन माध्यम महोत्सव यशस्वीरित्या पार पडला आहे. देशातील आघाडीच्या प्रकाशकांना त्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.देशभरातील विविध भाषेतील पुस्तके या महोत्सवामुळे वाचकांना उपलब्ध होतील. पुस्तक उत्सवात चर्चासत्रे तसेच अनेकविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचाही आस्वाद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व बीएमएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या उत्सवासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. साठ्ये महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या 8000 आहे आणि मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता या उत्सवाला भरभरून प्रतिसाद लाभेल असा विश्वास समन्वयक गजेंद्र देवडा यांनी व्यक्त केला आहे.

