पार्ले येथील देवस्थाने – गोखले यांचे श्री राम मंदिर

पार्ले येथील देवस्थाने – गोखले यांचे श्री राम मंदिर

विलेपार्ले हे एका छोट्याशा खेडे गावापासून इतक्या मोठ्या रूपात नावारुपाला आले आहे. पण अजूनही खरा पार्लेकर ते जुने पार्ल्याचे रूप आठवून अधिक सुखावतो. पार्ल्यातले ते छोटे छोटे बंगले , वाड्या , आजूबाजूला छान झाडे , छोट्या गल्ल्या , अगदी मस्त मनाला आनंद देणारे असे आमचे पार्ले गाव. आज भले मोठ्या मोठ्या इमारती आल्या , मोठी दुकाने , मॉल आले तरी इथल्या छोट्या गल्ल्यांमधून फिरताना आणि आजूबाजूच्या झाडांचा सुखद गारवा घेताना मन प्रसन्न होते. या पार्ल्याची खासियत म्हणजे पूर्व पार्ल्यात जवळ जवळ प्रत्येक गल्लीत एक देऊळ आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर टिळक मंदिर रोड वर साईबाबांचे देऊळ, राम मंदिर रस्त्यावर श्रीरामाचे देऊळ, हनुमान रोडवर दत्ताचे देऊळ, महात्मा गांधी रोडवर पार्लेश्वराचे देऊळ आणि समोरच असलेले जैन मंदिर , ठोसर वाडीतील हनुमानाचे देऊळ , कुंकूवाडीतील हनुमान मंदिर , प्रार्थना समाज रस्त्यावर चिमणा राम मंदिर अगदी अजमल रोडवर देखील छोटेसे देऊळ आहे. म्हणूनच आम्ही या पार्ल्यातील देवळांचा इतिहास आणि त्यांच्याबद्दलची माहिती देण्यासाठी पार्ल्यातील देवस्थाने हे सादर खास तुमच्यासाठी चालू केले आहे. तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. अजूनही काही माहिती अथवा फोटो असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचावा. या महिन्यातील देऊळ : 

गोखले यांचे श्री राम मंदिर

श्री राम मंदिर (राम मंदिर रस्ता व श्रद्धानंद रस्त्याच्या कोपऱ्यावर, विजय स्टोअर्ससमोर)

श्री राम मंदिर या देवालयाची स्थापना १९१३ साली कै. विष्णू विश्वनाथ तथा काका गोखले यांच्या पुढाकारामुळेच झाली. त्यांच्या स्वतःच्या जागेत त्यांनी हे देवालय बांधले. त्यांना आपले घराजवळच मंदिर हवे होते.

या मंदिराची दुसरीही एक विशेष गोष्ट म्हणजे दि. १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांचे निधन झाले. त्याच वर्षी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव या देवालयात साजरा करण्यात आला. त्यानंतर सन १९२१ व १९२२ या वर्षी ‘पारले सार्वजनिक मंडळा’ तर्फे याच मंदिरात एकूण तीन श्रीगणेशोत्सव साजरे झाले. पूढे पारले सार्वजनिक मंडळाने आपले कार्य ‘लोकमान्य सेवा संघ,- टिळक मंदिर, या संस्थेकडे सोपविले कारण सार्वजनिक मंडळ’ व ‘लोकमान्य सेवा संघ’ यांतील तिच मंडळी कार्यकता होती व त्यामुळे ‘पारले सार्वजनिक मंडळ’ बरखास्त करण्यात आले.

पारल्याच्या दृष्टीने धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कायाचा मुहुतमेढ खऱ्या अर्थाने श्रीराममंदिरात सुरु झाली. सन १९२३ या वर्षी चौथा सार्वजनिक श्री गणेशोत्सव टिळक मंदिरात लोकमान्य सेवा संघाच्या स्वतःच्या इमारतीत साजरा झाला. श्री राम मंदिर हे पारल्यातले जुने देवस्थान आहे. श्री राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती  अत्यंत सुंदर आहेत. श्रीराम जन्माचा सोहळा सुरूवातीपासून ते आजतागायत अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. श्रीराम जन्माच्या वेळी ह.भ.प. गोविद बुवा देव याची कीर्तने कित्येक वर्षे या मंदिरात झाली आहेत. कै. डॉ. सी. का. गोखले हे कित्येक वर्षे राम जन्मोत्सवासाठी भक्तिभावाने येत असत, महा प्रसाद होत असे.

सन १९६५-६६ चे सुमारास कै. बाबुराव परांजपे हे श्री राममंदिराचे प्रमुख विश्वस्त झाल्यानंतर त्यांनी देवालयाच्या परिसरात लादी बसवून घेतली व देवालयाची दुरुस्ती करुन रंग लावून घेतला. या मंदिरात कीर्तन, प्रवचन, भजने इत्यादी कार्यक्रम नियमितपणे चालू असतात. सुमारे ४० वर्ष के. काशिनाथ पंत तथा काका खरे गुरुजी यांनी देवस्थानचे पुजारी म्हणून व्यवस्था पाहिली. त्यानंतर त्यांचे पुतण कै. शंकर खरे यांनी पुजारी व व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

श्री राम मंदिर, श्री दत्त मंदिर व श्री पालेश्वर मंदिर या सर्व देवस्थानांचा एकच ट्रस्ट आहे.

क्रमश:

 

संदर्भ : विलेपार्ले अमृत स्मृती ग्रंथ

 

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu