श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकांचे विलेपार्ले येथे आगमन – १५ डिसेंबर, २०१६
राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी राजा शिवछत्रपतींचे गुरू यांच्या चरण पादुकांचे आगमन आपल्या विलेपार्ले नगरीमध्ये दिनांक १५ डिसेंबर, २०१६ गुरूवार रोजी होणार आहे. श्री समर्थ चरण पादुकांचा मुक्काम दिनांक २१ डिसेंबर २०१६, बुधवार दुपारी २ पर्यंत श्री पार्लेश्वर मंदिर, हिन्दू देवालय येथे राहील. भाविकांनी पादुकांच्या आणि समर्थांच्या नित्यपुजेतील मारूती रायाच्या दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा.
