टर्मरिक लाते … म्हणजे काय रे भाऊ ????

“अरे ऐक  आज आपण स्टार बक्स  मध्ये जाऊया , मस्त कॉफी पिऊया, छान गप्पा मारूया आणि संध्याकाळ छान घालवूया”. रिया मोहनला सांगत होती, मोहन म्हणाला ठीक आहे पण तेवढ्यात रिया म्हणाली अरे सोड कॉफी नको आज आपण टर्मरिक लाते घेऊया.   मोहन ने भुवया उंचावल्या , टर्मरिक लाते ?? हो आजकाल खूप ट्रेंड चालली आहे टर्मरिक लातेची तुला माहिती नाही ?? रिया ने विचारले.. अग टर्मरिक लाते म्हणजे काय ? रिया म्हणाली अरे तू माझ्याबरोबर चल म्हणजे मी तुला तिथे गेल्यावर दाखवते. दोघे गाडीत बसून जवळच्या स्टार बक्स मध्ये  पोहोचले,  तिथे पोहोचल्यावर मोहनने तिथल्या मेनूवर नजर टाकली आणि एकदम चपापलाच ! कॉफी स्मॉल १०० रुपये , मिडीयम १५० रुपये …. तीच गोष्ट टर्मरिक लातेची ! हे टर्मरिक लाते म्हणजे काय भानगड आहे हे बघायला त्याने त्यातले इन्ग्रेडिअनट्स बघितले तर हळद, दूध, सुंठ …. हे बघून तर त्याला हसूच फुटले … अरेच्चा हे तर हळदीचे दूध !!आणि किंमत २५० रुपये बापरे … मोहन ने लगेच रिया ला सांगितले रिया तू काय वेडी आहेस का ? यावर तू २५० रुपये रुपये खर्च करते आहेस ? रिया म्हणाली मग, यु डोन्ट नो , टर्मरिक लाते इस मोस्ट हेल्दी ड्रिंक… तुला माहित नाही  का त्याला अमेरिकेत बेस्ट हेल्दी ड्रिंक चा अवॉर्ड पण मिळाला आहे. 
मोहन मनातल्या मनात हसायला लागला , लहान पणापासून आई , आजी मागे लागायच्या ,अरे रोज थोडे हळदीचे दूध प्यावे तब्बेतीसाठी छान असते आणि आपण ते थट्टेत उडवायचो. आणि आज याच हळदीच्या दुधाचे नामकरण टर्मरिक लाते करून त्याची किंमत १०० -२५० रुपये ?? बापरे … हे बघता बघता त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले, आपण भारतीय , आपल्या संस्कृती , परंपरा म्हणजे बरेचदा त्यात काही अर्थ नाही, उगीचच आहेत असे मानतो, एखाद्या गोऱ्याने त्यावर शिक्कामोर्तब केले की  मग त्याची माहिती आपल्याला पटायला लागते. हळदीच्या दुधाच्या बाबतीतही तसच … 
 का प्यावी  ही  टर्मरिक लाते  ??

ती रोग प्रतिकार शक्ती वाढवते , ताकद वाढवते ,अँटी इन्फ्लमेटरी आहे आणि पचन सुधारते म्हणून ??

” हरिद्रा काञ्जनि पीता निशाख्या वरवर्णीनी
कृमिघ्ना हलदी योषित्प्रिया हट्टविलासिनी
हरिद्रा कटूका तिक्ता रुक्षोष्णा कफपित्तनुत
वर्ण्या त्वकदोष मेहास्र शोष पांडू व्रणापहा ”

हरिद्रा , कांचनी , पीता , निशा ,वरवर्णीनी ,कृमिघ्नी , हळदी , योषिप्रिय , हट्टविलासिनी अशी नावे असलेली हळद तिखट , कटू , उष्ण असून कफ , पित्त , त्वचारोग , प्रमेह , रक्त विकार ,पांडू रोग आणि व्रण यांचा नाश करणारी आहे.

हा साक्षात्कार आयुर्वेदाला नुकताच  झालेला नाही . हे ज्ञान आपल्याकडे कित्येक वर्षांपासून आहे.  
तुमचे लहानपण आठवा . . . फुटलेली कोपरं आणि सोललेली ढोपरं यावर प्रथम हळदीचा लेप लागत असे . . झाले का कोणाला ‘इन्फेक्शन ‘ ??

घसा बसला . . बरं वाटेनासं झालं की हळद आणि दुधाचा उतारा कसा कामी पडायचा ??

आठवतंय का ??  नाही . . . ??

बरं लग्नाच्या आधी ‘हळदीचाच ‘ कार्यक्रम का असतो हो ???
गेला बाजार नीळ , गुलाल किंवा काव यांचा का समारंभ नसतो ??
काय गरज काय त्या ‘ ओर्थ्रोडोक्स हळदी ची ??”
‘ पी हळद आणि हो गोरी असे होत नाही ‘ ही  म्हण आठवते आहे ना  ??
तर रंगाचा आणि हळदीचा , स्त्री आरोग्याचा आणि हळदीचा जवळचा संबंध आहे . . .

पण हे लक्षात कोण घेणार  ?? असो . . . !

तर अशी ही हळद . . . सूज नाहीशी करणारी , वेदना कमी करणारी , वर्ण्य , कृमी नष्ट करणारी , त्वचा विकारांचा नाश करणारी , जखम निर्जंतुक करून भरून काढणारी , रुची वाढवणारी , रक्ताचे प्रसादान करणारी , प्रमेहाचा नाश करणारी , गर्भाशयाचे शोधन करणारी , पित्ताचे शमन करणारी , तापाचा नाश करणारी आणि विषघ्न आहे . . .

म्हणूनच ही हळद मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते स्वयंपाक घराच्या फोडणीच्या डब्या पर्यंत हिंदू संस्कृतीत सर्वत्र अधिकाराने आणि मानाने आढळते . . .
काळ जसा पुढे गेला तसे आपण ‘का ?’ हा प्रश्न टाळून ‘कशाला ?’ हा प्रश्न अधिक विचारत गेलो त्यामुळे प्रत्येक गोष्टच अनावश्यक आणि अस्थायी वाटायला लागली .
गोष्ट सोप्पी आहे . . . हळदीचे दुध . . .खंत इतकीच आहे की या दुधाचा ‘ व्यावसायिक वापर ‘ करावा असे ना कोणत्या उत्पादकास वाटले . . .या दुधात खरेच ‘औषधी गुण ‘ आहेत असे आपले पूर्वज सांगत होते ते ना आम्हास कधी पटले . . .आजवर आम्ही स्वेच्छेने ना कधी ते प्यायलो  पण आता आम्ही ते रोज पिणार . . . ते कोठे मिळते याचे जॉइंट्स  शोधणार . . . का ???
कारण ते खरच पिण्याच्या लायकीचे असते हे आता सिद्ध होऊन आले आहे ना.. . पण खरंच सांगू पाश्चात्यांना काय सिद्ध करायचंय ते करू द्यात , आपल्या संस्कृतीवर आपण विश्वास ठेवायला शिका…आणि आता रोज हे प्यायचे असल्यास आईकडे , आजीकडे  हळदीचे दूध मागा टर्मरिक लाते म्हणालात तर….. ???? 

  • By cvm
    pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu