डायबेटिस – टाईप २ आणि होमिओपॅथी

गेल्या ३० वर्षात डायबेटिस – टाईप २ चे प्रमाण खूप वाढले आहे. ह्या डायबेटिसमध्ये ‘इन्सुलिन रेसिस्टन्स’ तयार होतो. ह्याची सुरुवात पॅनक्रियासच्या बीटा सेल मध्ये होते, जिकडे रक्तातील ग्लुकोजच्या वाढत्या प्रमाणात, इन्सुलिन हॉर्मोन कमी निर्माण होते.
ह्या डायबेटिस ची मूळ कारणे म्हणजे – लठ्ठपणा, पॅनक्रियासचे रोग , हॉर्मोनल इम्बॅलन्स – थायरॉईड, पिट्युटरी, ऍड्रिनल, काही औषधे अशी काही डायरेक्ट कारणे आहेत. इंडिरेक्ट कारणांमध्ये मद्यपान आणि स्ट्रेस.

डायबेटिस -२ चे प्रमाण मध्यम वयीन लोकांमध्ये जास्त आहे, साधारण ३५-५५ ह्या दरम्यान डायग्नोसिस होते. जेवढ्या उशिरा डायग्नोसिस होते तेवढेच इन्सुलिन रेसिस्टन्स वाढलेले असते. डायबेटिस हा रोग तुम्हाला आतून पोखरून काढतो.

लक्षणे: वजन वाढणे. मान, कोपर, काख, जांघेतील त्वचा काळवंडणे, तहान, भूक आणि लघवी चे प्रमाण वाढणे (रात्री उठून लघवी ला जाणे), त्वचेवर किंवा तोंडात फंगल इंन्फेकशन असणे, जखम भरायला वेळ लागणे, पायाच्या तळव्यांची त्वचा कडक होणे sensation कमी होणे, केस गळणे, फॅटी लिव्हर, ब्लड प्रेशर वाढणे, डोळ्यांनी कमी दिसणे, ई. लक्षणे आहेत.
ह्यातली लक्षणे आढळ्यास पाहिलेप्रथम लघवी – Urine routine आणि blood sugar level (फास्टिंग आणि जेवणानंतर) एकाच दिवशी दोन्ही टेस्ट्स करणे उत्तम.

होमिओपॅथी मध्ये अशा chronic (जुनाट) रोगांचे मूळ ‘सायकॉसिस’ आहे. सायकॉसिस म्हणजे overgrowth . म्हणजेच अतिरिक्त वाढ – जी मानसिक आणि शारीरिक पातळीवर दिसून येते. जसे डायबेटिस -२ मध्ये रक्तातल्या साखरेचे प्रमाण ‘वाढते’. रोगाची सुरुवात त्याच्या पॅथॉलॉजिकल बदलाच्याही पूर्वी होते. तर ‘अतिरिक्त वाढ’ हे मूळ डायबेटिक पेशंट्स मध्ये खूप पूर्वीपासून दिसून येते पण दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही. मी होमीओपॅथ असल्यामुळे डायबेटिक पेशंट्स मधील इतर observations सायकॉसिस च्या दृष्टिकोनातून जसे – अतिरिक्त विचार करणे, एखादी गोष्ट चढवून सांगणे, सतत चिडचिड करणे, संशयी वृत्ती, आत्महत्येचे विचार ( फक्त विचार ), जळफळाट करणे, एखादी वस्तू/पदार्थ न मिळाल्यामुळे बेचैन/ अशांत – दारू, तंबाखू, सिगार, नॉन-व्हेज. खाण्याचे पदार्थ – एक्दम गरम किंवा थंड आवडणे. गॅसेस चे प्रमाण जास्त असणे, जास्त घाम येणे व घामाचे डाग पडणे, चेहरा तेलकट असणे, मानेवर किंवा अंगावर कुठेही चामखीळ असणे, अचानक अंगावर तीळ येण्याचे प्रमाण वाढणे. वजन वाढणे, हॉर्मोनल इम्बॅलन्स – डायबेटिस, pcod , thyroid वाढणे , प्रोस्टेट वाढणे (Benign enlargement of prostate ), शरीरावर सूज येणे, रक्तातले कोणतेही घटक/पेशी वाढणे.नाकातून रक्त येणे, मासिक पाळीत जास्त रक्त जाणे, मूळव्याध, सांधे आखडणे, kidney stone , किलॉइड, शरीरात कुठेही गाठ,फायब्रॉईड, सिस्ट, नॉन – कॅन्सरस (benign ) tumour निर्माण होणे.

मी मुद्दाम, हे observations मनाच्या पातळीवर हळू हळू सुरु होऊन पुढे कसे पॅथॉलॉजिकल changes पर्यंत जातात हे मांडले आहे. तात्पर्य, जेवढ्या लवकर तुम्ही हि लक्षणे ओळखून, डॉक्टरांकडून तपासून, इलाज सुरु कराल तेवढ्या लवकर तुम्ही डायबिटीसवर विजय मिळवाल. होमिओपॅथीमुळे डायबेटीसमध्ये तुमच्या मनात आणि शरीरात होणारे उपरोक्त बदल चांगल्या प्रकारे थोपवू शकता.

– डॉ. शरयू राजवाडे : डाएट | फिटनेस | होमिओपॅथी
मुंबई | पुणे.
संपर्क: ८४२४८००२४७
Whatsapp for booking your appointment.
HIT LIKE AND FOLLOW ME @
Dr Sharayu R – www.facebook.com/sharayu4health 

Image source : Google images

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu