एप्रिल महिन्यातील उत्सव – रामनवमी , हनुमान जयंती

चैत्र शु . नवमी हा श्रीरामाचा जन्मदिवस , म्हणून या तिथीस रामनवमी म्हणतात . रामाला देव मानून आपण त्याची पूजा करतो . रामाला हे देवपण मिळाले ते त्याच्या अंगी असलेल्या एकबाणी , एकपत्नी आणि एकवचनी या अलौकिक गुणांमुळे . त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती , म्हणून त्याच्या राज्यास रामराज्य म्हणतात .
या दिवशी दुपारी रामजन्म साजरा होतो . त्यानंतर संपूर्ण दिवस रामनामाचा जप , -कथा कीर्तन व राम गुणगान असे कार्यक्रम होतात . अनेक ठिकाणी गीतरामायण म्हटलं जात . रामजन्म म्हणजे आदर्श , मर्यादा आणि सद्गुणांची सगुण पूजा. शिवकालीन काळात समर्थ रामदासांनी रामभक्तीला कालानुरूप उजाळा देऊन सद्गुण , पुरुषार्थ , पराक्रम आणि निष्ठा या गुणांची वाट मोकळी करून प्रजाजनांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांनी सहभागी केलं . गेल्या ब्रह्मचैतन्य श्रीगोन्दावलेकर महाराज यांनी रामभक्तीचा मोठा प्रसार केला .

राम जन्मापाठोपाठ येणारी रामभक्त हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेस मोठ्या प्रमाणावरउत्साहाने साजरी केली जाते . हनुमान म्हणजे , सामर्थ्य , भक्ती आणि दास्यभावाचा सजीव पुतळा . हनुमंताची राम निष्ठा खरोखरीच अवर्णनीय होती . 
हनुमंताची उपासना म्हणजे स्वामी निष्ठेची भक्ती , शक्तीची पूजा आणि सेवाभावाचा आदर होय . हनुमंताजवळ केवळ शक्तीच नव्हती तर -बुद्धी चातुर्याची युक्तीही होती . रामराज्य येण्यासाठी राज्यकर्त्यांचे चारित्र्य रामासारखे हवे आणि प्रजाजनांच्या ठायी हनुमान्तासारखी राज निष्ठा , पराक्रम , सामर्थ्य आणि सेवाभाव असावा हेच या उत्सवातून शिकायला हवे . 
या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी होते . त्यानंतर दिवसभर हनुमान मंदिरात भजन – कीर्तनाला रंग चढतो . तरुणाईला पराक्रमाच आणि देश सेवेसाठी साहसाच आव्हान या दिवशी मिळत . ते जर तरुणांनी स्वीकारलं तर राम राज्य येणं फारसं कठीण नाही . या दिवशी भाविक उपवास करतात . हनुमंत हा सात चिरंजीवपैकी एक चिरंजीव होय .
 
Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu