आषाढी अमावस्या – दिव्याची आवस

आपले जे दैनंदिन संस्कार आहेत त्यात संध्याकाळी देवापुढे समई लावून दिव्याची प्रार्थना करण्याची प्रथा आहे . हा संस्कार बहुतेक सर्व कुटुंबात आजही पाळला जातो . ” शुभं करोति कल्याणं ” हि प्रार्थना तर सर्व लहान थोरांना पाठ असते . त्यामुळे नित्याचारणात आपण दीप पूजनास खूप महत्व देतो. पण आषाढी अमावास्येला घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते . पूर्वी विजेचे दिवे नसल्याने घरात प्रकाश देणारे अनेक दिवे असत . आज विजेमुळे घरात समई , निरांजन असे मोजकेच दिवे असले तरी त्यांची पूजा या दिवशी करावी असा शास्त्रकार सांगतात . अनेक ठिकाणी या दिवशी पीठाचे दिवे प्रज्वलित करून त्यांचीही पूजा केली जाते .

नित्य व नैमित्तिक पूजेतही दीपपूजन केले जाते . यावरूनच दीपपूजेचे धार्मिक व सांस्कृतिक असे दोन्हीही दृष्टीने महत्त्व आहे हे लक्षात येईल .

दिव्याच्या प्रकाशाने नेहमी अंधाराचे निवारण होते . दिव्याच्या प्रकाशाने वस्तू उजळून निघते . तेजोमय दिसते . म्हणून दिवा हे मांगल्याच प्रतिक आहे . दीपपूजेचे आंतरिक अज्ञानही दूर होते . शत्रुबुद्धी नष्ट होते . विकार कुंठीत होतात . दिवा हे ज्ञानाचे द्योतक आहे . दीप तेजाने बुद्धीही स्थिर राहते . शिवाय ज्ञानाच्या एका दिव्याने हजारो दिवे पेटवता येऊ शकतात . विजेचे दिवे कितीही सुंदर व शक्तिशाली असले तरीही त्या दिव्यांनी इतर दिवे प्रकाशित होऊ शकत नाहीत . आपल्या वैदिक संस्कृतीत म्हणूनच दीप पूजेला मोठं महत्व आहे .

या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात . नंतर ते देवापुढे ठेवून दिव्यांभोवती रांगोळ्या काढतात . दिवे तेवूनच त्यांची गंध – फुलं -धूप अर्पून पूजा केली जाते व त्यास मनोभावे नमस्कार केला जातो . दिव्यांना दूध – साखरेचा नैवेद्य दाखवून लाह्या अर्पण केल्या जातात .
PC: unknown

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu