से चीज !!!!

कोण आहे असा जो लग्ना मध्ये भटजीला पण ऐकत नाही ?
कोण आहे जो लग्नात कोणत्याही विधीला pause करू शकतो?

बरोबर ओळखल — Photographer !

एक वेळेस लग्नात नवरा-नवरी नसतील तरी चालेल पण Photographer पाहिजेच… लग्नाचे फोटो म्हणजे एक उत्सुकतेचा विषय असतो. लग्नातले प्रत्येक क्षण खास असतात. हे खास क्षण जपून ठेवावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाचे अल्बम चाळताना, सहकुटुंबासोबत लग्नाचे व्हीडिओ बघताना या आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या होत जातात.

लग्नाचे व्हीडिओ व फोटो अल्बम हे दोन्ही प्रकार म्हणजे लग्नातल्या अनमोल क्षणांचा, त्या आठवणींचा पेटाराच असतो.काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं तसे या अल्बम-व्हीडिओ बनवण्याच्या पद्धतीतही बदल होत गेले.
डिजिटल युग अवतरल्यानंतर अल्बमचा खरा चेहरामोहरा बदलून गेला. डिजिटल युगातल्या अल्बमचा नवा आविष्कार म्हणजे करिज्मा अल्बम.
सध्या करिझ्मा अल्बमचा ट्रेण्ड आहे. फोटो काढून चिकटवण्यापेक्षा चांगल्या दर्जाचा ग्लॉसी किंवा मॅट पेपर वापरून फोटो प्रिंट केले जातात. एखादं मॅगझीन बघावं तसा याला इफेक्ट येतो. डिझाइन्सचा ले-आउट फोटो प्रिंटिंगच्या दुकानात ठरलेला असतो. त्यामध्ये फक्त फोटो बसवायचे असतात.डिजिटलायझेशनमुळे आणि प्रिंटिंगच्या नव्या तंत्रज्ञानामुळे अल्बममध्ये अनेक गोष्टी करणंही शक्य झालं. अनेक प्रकारचे लेआऊट, डिझाइन्स करून आपल्याला हवा तसा अल्बम तयार करता येतो . प्रिंटिंग केल्यानंतर त्यावर युवी कोटिंगचं तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे फोटो अल्बमच्या लूकमध्ये कमालीचा उठावदारपणा तर आलाच. शिवाय त्याचं आयुष्यमान वाढतं. काही वर्षांनंतर फोटो पिवळ्या पडतात आणि अल्बम खराब होतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी आता अनेक प्रकारचे कोटिंग विकसित करण्यात आले आहेत. हाय ग्लास युवी कोटिंग, मॅट युवी कोटिंग, टेक्स्चर कोटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोटिंगमुळे अल्बमचा लूक हवा तसा करता येतो. या अल्बमचं सादरीकरण आकर्षक असतं, यात काही शंका नाही. यात पिंट्रिंगसाठी वापरण्यात येणारा पेपरही चांगल्या दर्जाचा असल्याने हे अल्बम जास्त काळ टिकतात. या अल्बमची २० ते २५ वर्षे हमखास गॅरंटी असते.
यात ग्लॉसी पेपरमुळे अल्बमला एक वेगळीच चकाकी येते आणि मॅट पेपर कमी चकाकीचे असतात. ज्याच्या-त्याच्या पसंतीप्रमाणे पेपर निवडावा. मात्र हा अल्बम बनवणं जरा खर्चिक काम आहे.याची किंमत साधारणत: १००००/- ते ४००००/- च्या दरम्यान असते.
‘कॉफी टेबल बुक’
साधारण मध्यम आकाराच्या मॅगझिनप्रमाणे हा ‘कॉफी टेबल बुक’अल्बम असतो. करिझ्मा अल्बम बनवण्याच्या तुलनेत कॉफी टेबल बुक अल्बम करणं हे कमी खर्चिक आहे. त्यामुळे कॉफी टेबल बुक अल्बमला काही जणांची मागणी असते. या अल्बमचा टिकाऊपणा थोडा कमी असल्यामुळे तो थोडा जपून वापरावा लागेल. याची किंमत साधारणत: ४०००/-पासून पुढे सुरु होते.
एकूणच काय तर तंत्रज्ञानाच्या साह्याने बदललेलं अल्बमचं रुपडं आता सगळ्यांनाच हवंहवंसं वाटतंय. त्यामुळेच लग्नाच्या आठवणी आता अगदी छान स्वरुपात जपून ठेवता येत आहेत.
PC:Unknown

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu